Home आरोग्य मनपातर्फे दहाही झोन अंतर्गत एकूण ५१ नवीन लसीकरण केंद्र प्रस्तावित

मनपातर्फे दहाही झोन अंतर्गत एकूण ५१ नवीन लसीकरण केंद्र प्रस्तावित

0
मनपातर्फे दहाही झोन अंतर्गत एकूण ५१ नवीन लसीकरण केंद्र प्रस्तावित

मनपातर्फे दहाही झोन अंतर्गत एकूण ५१ नवीन लसीकरण केंद्र प्रस्तावित

विदर्भ वतन, नागपूर : शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. जास्तीत जास्त लसीकरण व्हावे यासाठी मनपातर्फे दहाही झोन अंतर्गत एकूण ५१ नवीन लसीकरण केंद्र प्रस्तावित आहेत. यापैकी १0 लसीकरण केंद्र सोमवार (ता. ५) पासून सुरू करण्यात आले.
२६ केंद्रांवर नियोजित मनुष्यबळ, डेटा एंट्री आॅपरेटर तसेच अन्य सोयीसुविधांची व्यवस्था पूर्ण झाली आहे. उर्वरित केंद्रावर लवकरात लवकर व्यवस्था करून या आठवड्यात सर्व लसीकरण केंद्र नागरिकांसाठी सुरू केली जाणार आहेत. यात लक्ष्मीनगर झोनमध्ये ७, धरमपेठ झोन ७, हनुमाननगर झोन ५, धंतोली झोन ५, नेहरूनगर झोन ४, गांधीबाग झोन ५, सतरंजीपुरा झोन ३, लकडगंज झोन ५, आशीनगर झोन ४ आणि मंगळवारी झोनमधील ६ केंद्रांचा समावेश आहे. पुढच्या काही दिवसात हे सगळे केंद्र सुरू करण्यात येतील, असे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले. शहरात ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ ते ५९ वर्ष वयापर्यंतच्या सर्व नागरिकांकरिता लसीकरण मोहीम राबविली जात आहे. या अभियानाअंतर्गत सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. तसेच प्रशासनाने जारी केलेल्या दिशानिदेर्शांचे काटेकोरपणे पालन करून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही महापौर आणि आयुक्तांनी केले आहे.
झोननिहाय लसीकरण केंद्र
लक्ष्मीनगर झोन :

1. श्री संत संताजी जगनाडे महाराज सांस्कृतिक भवन, राजीव नगर, प्रभाग क्र.३६,
-क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल, विवेकानंद नगर, प्रभाग क्र. १६, -समाज भवन, गजानन नगर, प्रभाग क्र. १६
-सोनेगाव समाज भवन, दुर्गा मंदिर जवळ, सोनेगांव, प्रभाग क्र. ३६
-स्केटिंग हॉल, हनुमान मंदिर जवळ, गायत्रीनगर, प्रभाग क्र. ३७
-महात्मा गांधी समाज भवन, शीतला माता मंदिरच्या बाजूला सुभाषनगर, रिंग रोड
-मनपा शाळा, शिवणगाव, प्रभाग क्र.३८
धरमपेठ झोन
-समाज भवन सभागृह, जगदीशनगर
-दाभा मनपा शाळा, दाभा रिंग रोड
-आयुर्वेदिक रुग्णालय तेलंखेडी, रामनगर
-शीतला माता मंदिर समाज भवन, सदर
-समाज भवन, टिळक नगर
-डिक दवाखाना, धरमपेठ व्ही.आय.पी. रोड
-बुटी दवाखाना, टेम्पल रोड, सीताबर्डी
हनुमाननगर झोन
-आझमशाह शाळा, शिवनगर, प्रभाग क्र. ३१
-दुर्गा नगर शाळा, शारदा चौक, जुना सुभेदार, प्रभाग क्र. ३२
-जानकी नगर, विठ्ठल नगर गल्ली नं. १, प्रभाग क्र. ३४
-मानेवाडा यूपीएचसी , शाहू नगर, बेसा रोड, प्रभाग क्र. ३४
-म्हाळगी नगर शाळा, म्हाळगी नगर, पाण्याच्या टाकी जवळ, प्रभाग क्र. २९
धंतोली झोन
-साखळे गुरुजी शाळा, गणेशपेठ, प्रभाग क्र. १७
-राहुल संकुल समाज भावन, गणेशपेठ, प्रभाग क्र. १७
-सेंट्रल रेल्वे रुग्णालय, मनीष बेकरी, अजनी, प्रभाग क्र. ३५
-गजानन मंदिर समाज भवन, दुलाबाई काचोरे ले-आउट, मनीषनगर, प्रभाग क्र. ३५
-चिचभवन मनपा शाळा, चिचभवन वर्धा रोड, प्रभाग क्र. ३५
नेहरूनगर झोन
-शीतला माता मंदिर समाज भावन, वाठोडा, गोपालकृष्णनगर
-शिवमंदिर समाजभवन, नंदनवन पोलिस स्टेशनजवळ
-कामगार कल्याण कार्यालय, लतिका भवन, चिटणीसनगर
8 इंदिरा गांधी समाजभवन, बिडीपेठ
गांधीबाग झोन
-अन्सार समाजभवन, हाजी अब्दुल मस्जीद लिडर शाळेजवळ, प्रभाग क्र. ८
-भालदारपुरा, गांजीपेठ रोड, अग्निशमन विभागाजवळ, प्रभाग क्र. १९
-नेताजी दवाखाना, पटवी मंदिर गल्ली, टिमकी, प्रभाग क्र. ८
-दाजी दवाखाना, शहीद चौक, इतवारी, प्रभाग क्र. २२
-मोमीनपुरा मनपा शाळा, मोमीनपुरा, प्रभाग क्र. ८
सतरंजीपुरा झोन
-जागनाथ बुधवारी प्रा. मुलींची शाळा, भारतमाता चौक
-मेहंदीबाग प्रा. शाळा, बारईपुरा, लालगंज
-कुंदनलाल गुप्तानगर मनपा शाळा, कुंदनलाल गुप्तानगर
लकडगंज झोन
-भरतवाडा प्रा. शाळा, भरतवाडा रोड, प्रभाग क्र. ४
-सतनामीनगर समाजभवन, सतनामी नगर, आंबेडकर चौक, प्रभाग क्र. २३
-मिनीमाता नगर प्रा. शाळा, मिनीमाता नगर, प्रभाग क्र. २४
-पारडी मनपा प्रा. शाळा, सुभाष चौक पारडी, प्रभाग क्र. २५
-कळमना मराठी प्रा. शाळा, जुना कामठी रोड, कळमना, प्रभाग क्र. ४
आशीनगर झोन
-वैशालीनगर हिंदी उच्च प्रा. शाळा, वैशालीनगर बसस्टॉप, प्रभाग क्र. ६
-वांजरी हिंदी प्रा. शाळा, विनोबा भावेनगर, प्रभाग क्र. ३
-ललितकला भवन, ठवरे कॉलनी, प्रभाग क्र. २
-एम.ए.के. आझाद हिंदी उर्दू शाळा, आशीनगर, प्रभाग क्र. ७
मंगळवारी झोन
-शाक्यमुनी समाजभवन, भीम चौक, नागसेननगर
-संत रामदास धरमशाळा, जरीपटका
-सेंट जॉन प्रायमरी स्कूल, मोहननगर,
-बोरगांव हिंदी प्रा. शाळा, पटेलनगर, गोरेवाडा रोड
-प्रशांतनगर मनपा उर्दू उच्च शाळा, जाफरनगर
-गोरेवाडा यूपीएचसी गोरेवाडा, नागपूर