Home Breaking News लाचखोर अभिलेखापाल एसीबीच्या जाळ्यात

लाचखोर अभिलेखापाल एसीबीच्या जाळ्यात

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8046*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

111 views
0

लाचखोर अभिलेखापाल एसीबीच्या जाळ्यात

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,महागाव : महागाव तालुक्यातील काळी दौ. येथील शेताकडे जाणा-या पांदण रस्त्याचे मोजमाप करण्यासाठी भूमि अभिलेख कार्यालयातील अभिलेखापाल व्ही. एन. हेमके यांनी चार हजाराची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी दोन हजार रुपए आधी घेतले होते. तर दोन हजार दि. ५एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटां दरम्यान तहसील कार्यालय समोर एका हॉटेलमध्ये घेताना रंगेहात पकडले. या घटनमुळे भूमिअभिलेख कार्यालय हादरून गेले आहे.
सविस्तर वृत्त असे की, काळी दौ. येथील शेतकरी फुलसिंग राठोड यांनी पांदन रस्त्याच्या मोजमाप पुन्हा करण्यासाठी अभिलेखापाल व्ही. एन. हेमके यांनी चार हजारांची मागणी केली होती. दोन हजार या आधी दिले होते. तर दोन हजार रुपये आज तहसील कार्यालयासमोरील एका चहाटपरीवर घेताना यवतमाळ येथील लाचलुचपत विभागाच्या अधिका-यांनी रंगेहात पकडले. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर नालट, पो कॉ सचिन भोयर,महेश वाकोडे, अब्दुल वसीम, राकेश सावसाकळे,व वाहान चालक संजय कांबळे यांनी ही कार्यवाही पार पाडली आहे.