Home Breaking News आगीत दोन घरे भस्मसात

आगीत दोन घरे भस्मसात

0
आगीत दोन घरे भस्मसात

आगीत दोन घरे भस्मसात

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,भंडारा : मोहाडी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर, न्यू नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी वसलेले किसनपूर येथे सोमवारी रात्री ९.३0 वाजता दरम्यान शार्ट सर्किटने दोन घरांना भिषण आग लागली. ग्रामस्थ, करडी पोलीस प्रशासन, वन विभाग व अग्निशमन दलाच्या दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
किसनपूर येथील जवाहरलाल ठाकरे व त्यांच्या भावाच्या घराला विजेच्या शॉट सर्किटमुळे आग लागली. घटनेची माहिती आमदार राजू कारेमोरे यांना मिळताच त्यांनी अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे पाठविल्या. करडी पोलीस दल तैनात झाले. नागरिकांनी प्रशासनास पूर्ण सहकार्य दिले. घटनेची तीव्रता लक्षात घेत आ. राजू कारेमोरे यांनी करडी क्षेत्राचे राष्ट्रवादीचे नेते चंद्रकुमार सेलोकर यांना तत्काळ पक्षांच्या कार्यकत्यांसह घटनास्थळी जाऊन जमेल ती मदत करण्याचे निर्देश दिले. गावकरी मंडळीच्या सहकायार्ने, पोलीस प्रशासन, वन विभाग व अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण करण्यात यश मिळविण्यात आले.
आ. राजू कारेमोरे यांच्या सांगण्यावरून तात्पुरती मदत म्हणून चंद्रकुमार सेलोकर यांनी ५ हजार रुपये मदत दिली. यावेळी करडीचे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक तांडेकर, काँग्रेस नेते श्रीकांत डोरले, मुकेश आगाशे, प्रणाल ठवकर, सौरभ सेलोकर, राधेश्याम उईके, व किसनपूर येथील गावकरी उपस्थित होते.