कालव्यात वाहून गेला शेतकरी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8034*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

131

कालव्यात वाहून गेला शेतकरी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील एक शेतकरी आपल्या शेताला पाणी देण्यासाठी आपल्या मोटारसायकलने मुख्य कालव्याच्या मार्गाने गेला. दरम्यान कालव्यातील पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला. ही घटना आज मंगळवार, दि. ६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. पांडुरंग बळीराम मडावी रा. इटखेडा असे त्या शेतक-याचे नाव आहे.
सविस्तर असे की, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटखेडा येथील पांडुरंग बळीराम मडावी हे महालगाव येथून आपल्या शेताला पाणी देण्यासाठी आपल्या मोटारसायकलने (क्रमांक एमएच ३५/ एन-५८४५) इटियाडोह कालव्याच्या मुख्य कालव्याने आपल्या शेताकडे जात होते. दरम्यान मोटारसायकलसह पांडुरंग कालव्याच्या प्रवाहात वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच बीटअंमलदार ज्ञानेश्वर बोरकर यांनी घटनास्थळ गाठले व पाण्यातून मोटारसायकल बाहेर काढली. पण अजूनपर्यंत पांडूरंग यांचा मृतदेह मिळून आला नाही. पोलीस शोधाशोध करीत आहेत.
घटनास्थळी अजुर्नी-मोरगावचे तहसीलदार विनोद मेसम व ठाणेदार महादेव तोंडले यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच मुख्य प्रवाह कमी करण्यासाठी कळविण्यात आले आहे. तपास बीट अंमलदार ज्ञानेश्वर बोरकर व प्रशांत बोरकर करीत आहेत.