वाघाने घेतला काका-पुतण्याचा बळी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8028*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

217

वाघाने घेतला काका-पुतण्याचा बळी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील पवनपार या गावातील जंगलात मोहफुले वेचायला गेलेल्या दोन व्यक्तींना वाघाने ठार केले. कमलाकर रुशी उंदिरवाडे व दुर्वास उंदिरवाडे असे मृत इसमांची नावे आहेत. सदर घटना सिंदेवाही वनपरिक्षेतात आज मंगळवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
दोन्ही मृत एकदुस-यांच्या नात्यातील असून काका-पुतणे होत. सध्या सर्वत्र मोहफुल वेचण्याचे काम सुरू आहे. अनेक शेतकरी मोहफुल गोळा करून बाजारात विक्री करतात व या माध्यमातून जोड धंदा करतात. सिंदेवाही तालुक्यातील पवनपार या गावातील काका-पुतण्या मोहफुल वेचण्यासाठी सकाळीच गेले. झाडाखाली मोहफुल वेचत असताना अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढविला. एका मागून एक अशा दोघांवरही वाघाने हल्ला करून ठार केले. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीकरिता पाठविण्यात आले. पुढील तपास सिंदेवाही पोलिस करीत आहे.