
वीजबिल माफी जाहीर न केल्यास मुख्यमंत्री निवासाबाहेर सत्याग्रह : रंगा राचुरे,
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,नागपूर : कोविड-१९ महामारी दरम्यान लॉकडामुळे राज्यातील जनतेची परिस्थिती फारच बिकट होती आणि आजपर्यंत जनता यामधून बाहेर पडलेली नाही. मागच्या महिन्यापासून अनेक जिल्ह्यामध्ये लॉकडाउन होते आणि काल पुन्हा आपण राज्यात लॉकडाऊन घोषित केले आहे. असे असतांना सरकारने बिल न भरू शकलेल्या जनतेची वीज जोड़नी कापण्यास सुरवात केली आहे. अजून जनजीवन सुरळीत झालेले
नसतांना, पुन्हा लॉकडाउन सुरु झाले असतांना सरकारने संवेदनशीलता दाखवत लॉकडाऊन काळातील वीजबिल माफी जाहीर करावी अन्यथा आम आदमी पार्टी जनतेला फसवणा-या मुख्यमंत्र्यांच्या निवासाबाहेर येत्या 19 तारखेला सत्याग्रह करेल, असा जाहीर इशारा आम आदमी पाटीर्चे राज्य संयोजक रंगा राचुरे यांनी दिला आहे.
सोमवारी विधर्भ संयोजक देवेंद्र वानखेड़े यांच्या नेतृत्वात मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले, या वेळी राज्य सहसचिव अशोक मिश्रा, नागपुर संयोजक कविता सिंघल, नागपुर संघटन मंत्री शंकर इंगोले व पदाधिकारी आणि अन्य कार्यकर्ता उपस्थित होतें.

