Home Breaking News वाढदिवसाला मिळाली मृत्यु भेट

वाढदिवसाला मिळाली मृत्यु भेट

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8014*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

175 views
0

वाढदिवसावर मिळाली मृत्यु भेट

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,नागपूर : वाढदिवसानिमित्त ढाब्यावर जेवण करून घरी परत जात असलेल्या युवकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघाती मृत्यू झाला. तर त्याचा मित्र जखमी झाल्याची घटना हिंगणा हद्दीत ४ एप्रिलला रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास घडली. हर्षद नंदकिशोर उजवणे (२३) रा. मनीष नगर, बेसा असे मृत युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, ४ एप्रिलला हर्षदचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी हर्षद त्याचा मित्र संकल्प संजय उडाण (२४) रा. संजय गांधीनगर हुडकेश्वर याच्यासोबत सरदार ढाबा येथे जेवण करण्याकरिता गेले होते.
जेवण झाल्यावर ते हर्षदच्या रॉयल इनफिल्ड गाडी क्र. एम.एच/४९/बी.एल /0२४६ ने जात होते. दरम्यान, हर्षदने त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजीने चालवित होता. हिंगणा हद्दीत जबलपूर बायपास रोडवरील नॅशनल कॅन्सर हॉस्पिटलसमोरील रोडवर त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याची गाडी रोडवर असलेल्या गिट्टीच्या ढिगा-यावर आदळली. या अपघातात हर्षद आणि संकल्प जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता श्युअर टेक हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी हर्षदला मृत घोषित केले.
याप्रकरणी तक्रारीवरून हिंगणा पोलिस ठाण्यात आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.