Home गोंदिया गोंदिया जिल्ह्याच्या लहानशा खेडे गावात राहणारी मौसमी कटरे झाली गोंदिया जिल्ह्यातील दुसरी महिला पीएसआय

गोंदिया जिल्ह्याच्या लहानशा खेडे गावात राहणारी मौसमी कटरे झाली गोंदिया जिल्ह्यातील दुसरी महिला पीएसआय

0
गोंदिया जिल्ह्याच्या लहानशा खेडे गावात राहणारी मौसमी कटरे झाली गोंदिया जिल्ह्यातील दुसरी महिला पीएसआय

गोंदिया जिल्ह्याच्या लहानशा खेडे गावात राहणारी मौसमी कटरे झाली गोंदिया जिल्ह्यातील दुसरी महिला पीएसआय
लहान पणा पासूनच मौसमीने बघितले होते स्वप्न

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,आमगाव : राधाकिसन चुटे : गोंदिया जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा पास करुन महिला पीएसआय होण्याचा मान ३० वर्षीय मौसमी कटरे या तरुणीने मिळविला असून येत्या ७ एप्रिल पासून मोसमी ही नागपूर शहर पोलिस ठाण्यात सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजाविणार आहे. गोंदिया जिल्ह्याच्या एका खेडे गावातील तरुणी आज जिल्यात चर्चेचा विषय बनली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्याच्या कातुर्ली गावात राहणारी ३० वर्षीय मौसमी कटरे. मौसमीने वर्ग १ ते १० पर्यंतचे शिक्षण याच छोट्याश्या खेड्यात घेत पुढील अभ्यास तिने गोंदिया शहरात केला असून लहानपणा पासूनच खाकी वर्दी घालण्याचा जज्बा मौसमीच्या मनात होता. वर्ष २०१६ मध्ये मौसमीने पुणे गाठत एमपीएससी परीक्षा देण्याचे ठरविले. मात्र २०१८ मध्ये तिने एसएससीची परीक्षा पास करीत नोकरी मिळविली. मात्र म्हणात पोलिस होण्याचा स्वप्न असल्याने तिने पुन्हा २०१९ मध्ये एमपीएससी परीक्षा पूर्व आणि मेन्स या दोन्ही परीक्षा पास करीत पीएसआयची नोकरी मिळविली असून तब्ब्ल १५ महिन्याचा पोलिस प्रशिक्षण घेत ती ३१ मार्चला घरी पोहचली.गावातील लोकांनी तिचे स्वागत केले. या आधी २००५ मध्ये गोंदिया जिल्ह्यात पहिली महिला पीएसआय म्हणून नियुक्त होण्याचा मान एका तरुणीने मिळविला होता. मात्र मौसमी कटरे या तरुणीने आपल्या गावातच पहिला आणि जिल्ह्यात दुस-यांदा पोलिस उपनिरीक्षक होण्याचा मान पटकाविला असून ती गावात परत येताच तिच्या मित्र मत्रिणी तिच्या भेटी करिता गर्दी केली तर काहींना आपल्या मैत्रणीला खाकी वर्दीत बघून सेल्फी काढण्याचा मोह देखील आवरला नाही. मोसमीच्या आई रचना कटरे ह्या जिल्हा परिषदेत शाळेत शिक्षिका असून यांनी आपल्या मुलीला पोलिस बनविण्याचा स्वप्न पहिले असून या त्यांचा छंद आज पूर्ण झाला. तिचा भाऊ सागर हा देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे तर मौसमीच्या आजोबानी तिला लहान पणा पासून जनरल नॉलेजचे धडे दिल्याने तिला स्पर्धा परीक्षा पास होण्यास मदत मिळाली आहे. मौसमीच्या गावातील ५० च्या वर लोक मिल्ट्री ,आर्मी आणि सीआरपीएफ मध्ये नोकरी करीत असून मोसमी ही गावातील पहिली महिला पोलिस अधिकारी झाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे. तिच्या भेटीला येणारे लोक गोड खाऊ घालून तिचे कौतुक करीत असून मुली देखील मुलानंपेक्षा कमी नाहीत हे सिद्ध करून दाखविले आहे