Home Breaking News रामाच्या नगरीत कुठून आले रावण…

रामाच्या नगरीत कुठून आले रावण…

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7991*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

234 views
0

रामाच्या नगरीत कुठून आले रावण…

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,नागपूर : देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. याच दरम्यान उत्तर प्रदेश एका भयंकर घटनेने पुन्हा एकदा हादरले आहे. अयोध्येत ४ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशच्या अयोध्या जिल्ह्यातील रुदौली परिसरातील एका गावात चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गावातील तरुणानेच हे कृत्य केले आहे. मुलीची प्रकृती गंभीर असून तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, चार वर्षांची मुलगी संध्याकाळी उशिरापर्यंत घरासमोर खेळत होती. घटना घडली त्यावेळी आम्ही शेतावर गेलो होतो. त्यावेळी गावातील तरुण मुलीला घेऊन गेला. गावाबाहेरील ओढ?ाच्या दिशेने नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केले असे मुलीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे. मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने गावात खळबळ उडाली. कुटुंबीयांसह गावातील लोकही त्या मुलीचा शोध घेत होते. गावाजवळील ओढ?ाजवळ मुलगी रडत बसली होती. तिची प्रकृती बिघडली होती. कुटुंबीयांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. रुदौली पोलीस ठाण्याचे प्रमुख राकेश श्रीवास्तव यांनी पीडितेच्या आईने आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटकही केली आहे अशी माहिती दिली आहे.