गंभीर आरोपांनंतर १५ महिन्यात ‘मविआ’च्या २ मंत्र्यांचे राजीनामे?

329

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी सुरू असलेला खटाटोप संपुर्ण राज्यातील जनतेनी पाहिला़ याला सत्ताकारणाचे महानाट्यच म्हणावे लागेल़ भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे ‘कोणी पाठींबा देता का, पाठींबा’ अशीच काहीसी स्थिती होती़ भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्यात सत्तासाठी कमालीची रस्सीखेच सुरू होती़ भाजपने आपला जुना मित्रपक्ष शिवसेनेला समजाविण्यासाठी केलेला खटाटोप अनेक दिवस सुरू राहीला़ अखेर नाराज शिवसेनेपुढे त्यांचे काहीही चालले नाही़ त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता स्थापन होते काय असेही चित्र होते़ अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी राज्यपालांची घेतलेली भेट व जनतेसाठी धक्कादायक असलेला शपथविधी हेही सदैव स्मरणात असणारे आहे़ मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा पक्षाची अधिकृत भुमिका नाही हे जाहिर केल्यानंतर आणखीच वातावरण चिघळले़ आमदार पळवले जाऊ नये म्हणून सर्व पक्षांनी आपल्या आमदारांची अज्ञातवासात रवानगी केली़ अखेर सामंजस्याने शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशी महाविकास आघाडी महाराष्ट्रात उदयास आली़ मुख्यमंत्री शिवसेनेचाच ही हाक इतर मित्रपक्षांनी एकत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद दिले तर राष्ट्रवादीचे अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले व सर्वाधीक जागा जिंकणाºया भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले़
मात्र सत्तास्थापनेनंतरही महाविकास आघाडी सरकारची ‘बिघाडी’ काही केल्या संपत नसल्याचे चित्र आहे़ भाजपने विरोधी पक्षाची भुमिका खंबीरपणे निभावत महाविकास आघाडी सरकारला मिळेल त्या मुद्यांवर घेरणे सुरू केले़ त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर लागलेल्या गंभीर आरोपांमुळे २ मंत्र्यांना आपला राजीनामा द्यावा लागला़ तर दोन मंत्री राजीनाम्यापासून वाचविल्या गेले़
सर्वप्रथम सामाजिक विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर महिलेने लावलेले बलात्काराचे आरोप हा चर्चेचा विषय ठरला़ विरोधी पक्षानेही हा मुद्दा चांगलाच उचलून धरला़ मात्र पक्षाची खंबीर साथ असल्यामुळे त्यांना राजीनामा देण्याची वेळ आली नाही व आपसी समझोत्यातून प्रकरण संपुष्टात आले़ त्यानंतर पुजा चव्हाण या तरूणीच्या आत्महत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनीही काही दिवस ‘वेट अँन्ड वाँच’ची भुमिका स्विकारली़ मात्र राज्यासह देशभर प्रकरण अधिकच चिघळल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला़ कोरोना काळात जनतेला वीजबिलात सुट दिली जाणार या घोषणेमुळे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनाही चांगलीच गळचेपी झाली़ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत होत असल्यामुळे जनतेसह विरोधी पक्षाने राजीनाम्याची मागणी करीत शासनाविरोधात नाराजी व्यक्त केली़ ऊर्जामंत्र्यांच्या राजीनामा संदर्भात बातम्याही तशा प्रकाशित झाल्या़ तसेच त्यांचेएवजी नाना पटोले यांना ऊर्जाखाते मिळणार अशीही चर्चा होती मात्र तेही तेवढ्यापुरतेच राहीले़ अखेर आज वाझे प्रकरणामुळे मुंबईचे पुर्व पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांच्या आरोपांमुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला़ त्यामुळे भविष्यातही महाविकास आघाडीचे संकट कमी होऊन शासनाकडून कोरोनाकाळात जनतेला चांगले दिवस येतील हीच अपेक्ष आता व्यक्त होत आहे़