‘आश्वासन आणि निषेध’ यापलीकडे काय? २२ जवानांच्या हुतात्म्यानंतर देशाचा संतप्त सवाल

244

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – रविवारी दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी छत्तीसगड येथील जंगलात केलेल्या भ्याड हल्ल्यात देशाचे २२ जवान सुपुत्र शहीद झाले तर १४ जवान जखमी झाले़ नक्षलवादी म्हणजे देशाच्या अंतर्गत लागलेली किड आहे़ देशाबाहेरील शत्रुशी दोन हातांची झुंज करतांना ही किड अंतर्भागालाही पोकळत चालेलली आहे़ सीआरपीएफची तुकडी सर्च आँपरेशन करीत असतांना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांच्या ताफ्यावर तिन्ही बाजुंनी हल्ला चढवला़ या चकमकीत १५ ते २० नक्षलवादीही ठार झाल्याचे वृत्त आहे़ मागील अनेक वर्षांपासून सीआरपीएफ, गडचिरोली पोलिसांसोबतच अनेक जवानांनी रात्रंदिवस गडचिरोली, छत्तीसगढ येथील जंगलात आपले कर्तव्य बजावले व आजही तटस्थ आहे़ नक्षल्यांचा नायनाट हाच एकमेव उद्देश त्यांनी डोळ्यापुढे ठेवत घरदार व कुटुंब सोडून नक्षल्यांशी दोन हात करीत आहे़ अशातच काल झालेल्या हल्लयामुळे आणखी काही धक्कादायक खुलासे पुढे आलेले आहे़
काल नक्षल्यांनी वापरलेल्या शस्त्रसाठांमध्ये राँकेट लाँन्चर, एक ४७ या सोबतच काही अत्याधुनिक उपकरणांचा वापर केला़ त्यांच्याकडे ही अत्याधुनिक उपकरणे आली कोठुन हाही एक प्रश्न आहे़ नक्षलवादी कारवायांना मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ आहे हे काही वर्षांपुर्वीच उघडकीस आले़ आदिवासी बहूल भागात नक्षलवाद्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे़ काही ग्रामस्थही त्यांना मदत करीत असतात़ अशातच नक्षलविरोधी चळवळ चालविणे म्हणले अतिशय जोखीमीचे काम आहे़ आजवर नक्षलवाद्यांमार्फत घडविण्यात आलेल्या लहान मोठ्या हल्ल्यांमध्ये अनेक जवान शहीद झाले़ अशा घटनांनंतर सरकारची काय ठोस भुमिका असते याकडे जनतेचे लक्ष लागलेले असते़ मात्र ‘निषेध आणि आश्वासन’ यापलीकडे काहीच नसते़ दोन-चार दिवसांच्या क्रोधानंतर पुन्हा तेच प्रकार सुरू असतात़ त्यामुळे नक्षलवाद्यांचा कठोर नायनाट कधी असाही संतप्त प्रश्न उपस्थित होतो़ शहीद जवानांचे अनेक कुटुंब आहेत जे आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे़ वारंवार त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांचेही उत्तर मिळणे बंद होते़ आणि पुन्हा स्थिती जैसे थे़़़़
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीसगड येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर नक्षलवादाविरोधातील आपली लढाई आणखीन ताकदीनं लढून आणि या लढाईत आपण नक्कीच विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केलाय. संरक्षण दलांची पथके आणि नक्षलवाद्यांमध्ये छत्तीसगडच्या जंगलात झालेल्या चकमकीत २२ जवान शहीद झाल्याची माहिती रविवारी समोर आली. नक्षलवाद्यांनी घडवलेले हे अलीकडच्या काळातील मोठे हत्याकांड ठरलं असून याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्र्यांनी घटनास्थळाला भेट दिली. सुकमा आणि बीजापूर जिल्ह्यांच्या सीमाभागात ज्या ठिकाणी जवानांवर हा हल्ला झाला त्या ठिकाणीची पहाणी शाह यांनी केली तसेच त्यांनी शहीद जवानांना देशाच्यावतीने श्रद्धांजलीही अर्पण केली.
पंतप्रधान, केंद्र सरकार आणि संपूर्ण देशाच्यावतीने मी या नक्षलवादी हल्ल््यामध्ये प्राण गमावलेल्या संरक्षण दलातील जवानांना श्रद्धांजली अर्पण करतो. या जवानांचं बलिदान देश कायमच लक्षात ठेवले. या जवानांनी नक्षलवादाविरोधात दिलेला हा निर्णायक लढा कायमच स्मरणात राहील,ह्व असं शाह यांनी जगदालपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं.
चकमकीत शहीद झालेल्या जवानांमध्ये डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड (डीआरजी)च्या आठ, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) कोब्रा पथकाच्या सात, स्पेशल टास्क फोर्सच्या सहा आणि सीआरपीएफच्या ‘बस्तरिया’ बटालियनच्या एका जवानाचा समावेश असल्याचे बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले. कोब्रा पथकाचे अनेक जवान अद्याप बेपत्ता असून त्यांचा जंगलात शोध घेण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. नक्षलवाद्यांनी नियोजनपूर्वक हा घातपात घडवला, परंतु संरक्षण पथकांचे जवान त्यांच्याशी धैर्याने लढले, असेही त्यांनी सांगितले. या चकमकीत शहीद झालेल्या पाच जवानांचे मृतदेह शनिवारी सापडले होते.
तेकलगुडा गाव आणि परिसरातील छोटा टेकडांवर मोक्याच्या जागांवरून सुमारे ४०० नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने दिली. जवानांवर अचानक हल्ला केला. चकमकीच्या ठिकाणी रस्ते, पायवाटा आणि शेतांमध्ये गोळ्यांनी चाळण झालेले जवानांचे मृतदेह आढळले. मृतदेहांवर गोळ्यांबरोबरच धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणाही आढळल्या, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
नक्षलवाद्यांविरोधात बिजापूर जिल्हतील तारेमच्या जंगलात २ एप्रिलला सुरू केलेल्या मोहिमेत शेकडो जवान सहभागी झाले होते. एकाच वेळी बिजापूर जिल्हतील तारेम, उसूर, पामेद आणि सुकमा जिल्हतील मिनपा आणि नरसापूरम अशा पाच ठिकाणांहून ही कारवाई सुरू करण्यात आली होती. गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली होती, असेही सुंदरराज पी. यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, संरक्षण दलांवरील अनेक घातपाती हल्ल्यांमध्ये सामील असलेल्या पीपल्स लिबरेशन गुरीला आर्मी (पीएजीए) बटालियन १चा म्होरक्या हिदमाबद्दल माहिती गुप्तचरांकडून माहिती मिळाली होती. त्याला घेरण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली होती.