Home Breaking News नागपूरची प्राची दांडेकर विद्यापिठाच्या गुणवत्तायादीत चौथ्या स्थानावर

नागपूरची प्राची दांडेकर विद्यापिठाच्या गुणवत्तायादीत चौथ्या स्थानावर

0
नागपूरची प्राची दांडेकर विद्यापिठाच्या गुणवत्तायादीत चौथ्या स्थानावर

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाच्यावतीने नुकतेच प्रकाशित करण्यात आलेल्या एम़ए़ अर्थशास्त्र अभ्यासक्रमामध्ये कु. प्राची भाऊराव दांडेकर हीने चौथ्या स्थानी आपल्या नावाची नोंद केलेली आहे़ सी़ पी़ अँन्ड बेरार महाविद्यालयाची विद्यार्थीनी असलेल्या प्राचीने कठोर परिश्रम व दृढसंकल्पाने आपले नाव निश्चीत केलेले आहे़ तिच्या या यशाचे श्रेय तिने पालक तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांना दिले असून तिच्या या यशाबद्दल अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे़