कोरोनाग्रस्त रुग्णाच्या नातेवाईकांकडून पैसे उकळण्याचा गोरखधंदा

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7938*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

389

कोरोनाग्रस्त रुग्णाच्या नातेवाईकांकडून पैसे उकळण्याचा गोरखधंदा

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-नागपूर : सरपंच परिषद संघटना कामठी तालुका अध्यक्ष बंडू कापसे यांच्या वतीने कामठीचे तहसीलदार अरविंद हिंगे तसेच पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गायबोले यांना बुधवारी खाजगी दवाखान्यात अमाप पैसे घेण्याचा सावळागोंधळ होत असल्याचे निवेदन देण्यात आले. निवेदना मध्ये मा. जिल्हाधिकारी नागपूर यांनी खाजगी रुग्णालयाला दिलेले नियय न पाळता कोरोनाग्रस्त रुग्णाच्या नातेवाईकांकडून पैसे उकळण्याचा गोरख धंदा अतिप्रमाणात चालू आहे. कोरोना भरारी पथकाद्वारे तपासणी करून त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक खाजगी दवाखान्या समोर शासनाच्या नियमानुसार दिलेल्या किमतीचे फलक लावण्यात यावे आणि त्यावर अंमलबजावणी करण्यात यावी. असे निवेदनात देण्यात आले.