होमिओपॅथी तज्ञ डॉ.सुरेंद्र वानखेडे यांना भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम पुरस्कार

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7932*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

295

होमिओपॅथी तज्ञ डॉ.सुरेंद्र वानखेडे यांना भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम पुरस्कार

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-नागपूर : आॅल इंडिया अँड रिसर्च अकादमी नवी दिल्ली यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या अतिविशिष्ट व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. या वर्षीचा बहुमान हा संत्रा नगरीला प्राप्त झालेला आहे. वैद्यकीय आणि कृषी क्षेत्रात विविधांगी कामगिरी करणारे होमिओपॅथी तज्ञ डॉ. सुरेंद्र वानखडे यांना यावर्षीचा भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम एक्सलन्स गोल्ड मेडल अवार्ड घोषित करण्यात आला. हा पुरस्कार डॉ. वानखेडे यांना चेन्नई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यापूर्वी डॉ.सुरेंद्र वानखेडे यांना दलित साहित्य अकादमीचा डॉ. आंबेडकर पुरस्कार देण्यात आला. तसेच जापान येथे आयोजित जागतिक शांतता परिषदेत डॉ. वानखेडे हे सहभागी झाले होते. त्यांच्या या कामगिरी बद्दल विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्तींनी त्यांचे अभिनंदन केले .