समता नगर येथील रोड दुरुस्ती व नवीन गडर लाईनचे काम त्वरीत करा

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7926*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

277

समता नगर येथील रोड दुरुस्ती व नवीन गडर लाईनचे काम त्वरीत करा

-आप ने लकडगंज झोन अधिकारी यांना दिले निवेदन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-नागपूर आम आदमी पार्टी तर्फे लकडगंज झोन अंतर्गत पारडी प्रभाग क्र. २५ समता नगर येथील रोड दुरुस्ती आणि नवीन गडर लाईन टाकून देण्यासंबंधी लकडगंज झोन येथे मा. सहायक आयुक्त मनपा ह्यांना निवेदन देण्यात आले.
मागील काही दिवसांपासून पारडी प्रभाग क्र. २५ समता नगर येथील गल्ली नंबर १,२ आणि ३ येथे रोड आणि नवीन गडर लाईन टाकून देण्यासंबंधीची मागणी संबंधी अनेक तक्रारी आम आदमी पार्टी कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने आज ह्या मुद्द्यांवर लक्ष वेधण्यासाठी जनतेचे ज्वलंत प्रश्न घेऊन आम आदमी पाटीर्ने लोकांना होणा-या गडर लाईनची समस्या तसेच रोड दुरुस्ती ताबडतोब करण्यासंबंधी येथील नागरिकांना घेऊन लकडगंज झोन येथे मा. सहायक आयुक्त, मनपा हयांना निवेदन सादर करून जनतेला होणा-या त्रासापासून मुक्तता मिळावी व चांगल्या सोई सुविधा निर्माण करून देण्यात याव्यात अशी विनंती करण्यात आली. .
हे निवेदन बबलू मोहाडिकर यांच्या नेतृत्वात व विदर्भ जनसंपर्क संघटन मंत्री आकाश सफेलकर आणि नागपुर सहसंयोजक राकेश उराडे यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले. हे निवेदन देतस्तान प्रामुख्याने नागपुर युवा सचिव प्रतीक बावनकर व स्थानीय कार्यकर्ते मनोज जोशी, प्रकाशजी पैगवार, मंगेश खोबरागडे, राहुल साहू, सुरेश राठी, निलेश गुज्जर, बिट्टू सनोडीया, रोहित वाघमारे आणि समस्यांग्रस्त नागरिक उपस्थित होतें.