
ग्राम विकास अधिकारी रहांगडालेच्या मृत्यूपुर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत सरपंचाच्या पतीच्या नावाचा उल्लेख
राधाकिसन चुटे, गोंदिया जिल्हा प्रतिनिधी, विदर्भ वतन – वरिष्ठांच्या जाचाला कंटाळुन आऱएफ़ओ़ दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे राज्यभरात संताप व्यक्त करीत असतांनाच गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव पंचायत समितीतंर्गत येणाºया कुºहाडी ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी आणि ग्राम पंचायतीचे सरपंच यांचे पती यांनी ग्रामपंचायतीच्या कामामध्ये ढवळा ढवळ आणि खोटे बिल लावण्याच्या अपव्यवहाराला व्यथित झाल्याने ग्रामविकास अधिकारी रहांगडाले यांनी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाला़ या संदर्भात आरोपी सरपंचाच्या पतीवर गुन्हा दाखल करावा आणि आरोपीस अटक करावी या मागणीसाठी मृतकाच्या कुटूंबियांनी ग्राम विकास अधिकारी रहांगडाले याचा मृतदेह गोरेगाव पोलिस ठाण्यात नेऊन ठेवला़
ग्राम पंचायत कुºहाडीचे सरपंच यांच्या पती मार्तंड पारधी सोबत ग्रामविकास अधिकारी यांचा वाद झाल्याने ग्राम विकास अधिकारी यांनी दोन दिवसांपुर्वी रात्रीला थिमेट नामक विषारी औषध प्राशन केले. विषारी औषध प्राशन करण्यापुर्वी त्यांनी एक चिट्टी लिहिली़ त्या चिट्ठीमध्ये कुºहाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या पतीच्या नावाचा उल्लेख असल्याचे बोलले जात आहे. विषारी औषध प्राशन केल्याचे घरच्यांना कळताच त्यांनी लगेच रुग्णालयात हलविले, मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मृतकाच्या पत्नीने चिठ्ठीच्या आधारावर तक्रार केली होती़ तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी विरोधात 309 भादवी अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीला अटक करण्यात आली होती़ त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केले होते़ त्यामुळे त्यांचे कुटुंबीय आणि ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी यांना समाधान झाले नाही़ त्यामुळे त्यांचा मृतदेह पोलीस स्टेशनच्या समोर ठेवण्यात आला व आरोपीविरोधात कलम 306 च्या गुन्हा नोंद करा आणि आरोपीला त्वरित अटक करा असे कुटुंबियांनी मागणी केली होती़ त्यानुसार गोरेगाव पोलिसांनी त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात दाद मागितली़ तेव्हा न्यायालयाने आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले़ त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकूल यांनी गोरेगावचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांना कलम 306 लावण्याचे आदेश दिल़े तर पोलिसांनी मृताच्या कुटुंबीयांना आरोपीला 24 तासाच्या आत अटक करण्याचे आश्वासन दिले़
विशेष म्हणजे आरोपी स्वत: शासकीय नोकरीवर असून शासकीय कामात कोणत्याही प्रकारची दखल देऊ शकत नाही़ हे माहीत असून सुद्धा ग्रामपंचायतच्या कामामध्ये आरोपीने हस्तक्षेप केला़ ग्राम विकास अधिकारी रहांगडालेच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे़

