
स्वरसती नगरात बालगोपालांनी रंगपंचमीचा घेतला आनंद……..
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-नागपूर-दक्षिण नागपूर सरस्वती नगर मानेवाडा रिंग रोड प्रभाग 34 मधील धुलीवंदन रंगोत्सव. कोरोना महामारी मुळे यावर्षी नागपूर शहरात फारच मोजक्या ठिकाणी होळीचे दहन झाले पण रंग, गुलाल खेळण्यास काही नागरीकांमध्ये फारसा उत्साह दिसलेला नाही. परंतु छोट्या छोट्या मुलांनी दिवसभर रंग व पिचका-या सह रंगोत्सव साजरा केला.
कोरोना काळात या होळीच्या पर्वावर कोरोनाने जगभरात थैमान घातले असून शहरातील नागपूरकरांनी आपआपल्या घरी धूलीवंदन शांततेत पार पडला. यावर्षी मोठ्याची होळी नसून बालगोपालांनी रंगपंचमीचा आनंद घेतला.
सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी होळी, धूलीवंदन साजरी करण्यास मनाई होती तरीसुद्धा नागरिकांनी परंपरेनुसार होळीचा आनंद घेतला.
याप्रसंगी बाल गोपालांची नावे ओझस पोल, प्राप्ती पोळ, अर्णव पोल, नव्या पोल, अभिरा रोडे आणि बच्चा पार्टी- शिवाय बेसरवर, देवांशी बेसरवार , प्रिशा गणोरकर, समरा फुले, आणि कार्तिक गणोरकर या बालगोपालांनी खुप्पच रंगपंचमीचा मोठ्या आनंदाने रंगोत्सव साजरा केला.

