Home नागपूर मंगल कार्यालय/हॉल/लॉन मध्ये लग्न सोहळा सुरू करण्यास परवानगी द्यावी.

मंगल कार्यालय/हॉल/लॉन मध्ये लग्न सोहळा सुरू करण्यास परवानगी द्यावी.

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7903*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

191 views
0

मंगल कार्यालय/हॉल/लॉन मध्ये लग्न सोहळा सुरू करण्यास परवानगी द्यावी.

-मा. मंत्री गडकरी यांना निवेदन सादर

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-नागपूर : मंगल कार्यालय अँड हॉल आसोसिएशननी रविवारी मा. नितीनजी गडकरी साहेब, केंद्रीयमंत्री, यांचाशी भेट घेऊन चर्चा केली व निवेदन देण्यात आले. निवेदना मधे मंगल कार्यालय/हॉल/लॉन मध्ये लग्न सोहळा सुरू करण्यास परवानगी द्यावी.भारतात वेडिंग इंडस्ट्री ही सर्वात मोठी रोजगार उत्पन्न करणारी इंडस्ट्री आहे. यात 1 लग्न समारंभामागे कमीत कमी 200 परिवार अवलंबून असतात. त्यामधे केटरिंग, शेफ,ग्रोसरी सप्लायर, डेअरी, किराणा सप्लायर, इवेंट मेनेजमेंट ग्रुप, साफ सफाई करनारे वर्कर, सिक्युरीटी गार्ड, फ्लॉवर डेकोरेशन, बग्गी, ढोल, बँड बाजा, घोडा, फोटोग्राफर, मेहंदी आर्ट, ब्यूटीशीयन, कोरियोग्राफर, सिंगर, म्युझिशीयन, डी.जे., कपडा व्यापारी, वेलेट पार्किंग गार्ड असे अनेक रोजगार अवलंबून असतात. आता हॉल बंद असल्यामुळे सर्वांचे रोजगार हिरावुन घेतले आहे.
गेल्या 1 महिन्यापासून आमच्याकडे आवक नाही. त्यामुळे आजच्या परिस्तिथीत नोकरांचे पगार, विद्युत बिल, प्रॉपटी कर, लॉकडाउनमुळे न होऊ शकलेल्या कार्यक्रमाचा परतावा देण्यास आम्हाला मोठी अडचण होत आहे.
महाराष्ट्रात कोरोना वाढत असतांनाही पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई व इतर शहरात मात्र कडक निर्बंध आहे परंतु लॉकडाऊन नाही तिथे आत्ताही लग्न समारंभ करण्याची परवानगी आहे. कोरोना वाढत आहे म्हणून लॉकडाउन करने हे कोणालाच परवडणारे नाही. तर त्यासोबत कसे जगता येईल यावर प्रशासनाकडून उत्तर अपेक्षित आहे.
काही ठिकानी नागपुर शहराच्या बाहेर रिसॉर्ट व फार्म हाऊस वर लोकांनी विवाह संपन्न केले तेथे मात्र प्रशासनाची कारवाई झाल्याचे दिसले नाही.
जबरदस्ती संचार बंदीचे आदेश काढून मूलभूत अधिकारापासून आम्हाला वंचित केले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने गेल्या वर्षीच्या मार्च 2020 पासून आता पर्यंतचे वीज बिल, प्रॉपर्टी कर, मासिक व्याज अम्हाला माफ करावे किंवा टाळेबंदीत झालेल्या नुकसानीचा मोबदला द्यावा.
ज्याप्रमाणे रेस्टारेंट, सिनेमागृह, येथे क्षमतेच्या 50% वापरण्यास परवानगी आहे.त्याच अनुषंगाने आम्हाला सुद्धा परवानगी द्यावी व आमच्या या भव्य वेडींग इंडस्ट्रीला आर्थिक डबघाई व उपासमारी येऊ नये याची दखल घ्यावी ही सर्वांतर्फे शासनाला विनंती.
त्यावेळेस एसोसिएशनचे पदाधीकारी संजय काळे, विजय तलमले, आशिष देशमुख, विजय कनकदंडे, बंडू भाऊ राऊत, अरोरजी,आदि पदाधिकारी उपस्थित होते.