दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात कारणीभूत असलेल्या सर्वच अधिका-यांवर कठोर गुन्हा दाखल करा

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7889*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

188

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात कारणीभूत असलेल्या सर्वच अधिका-यांवर कठोर गुन्हा दाखल करा

-अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-नागपूर : अखिल भारतीय मराठा महासंघ नागपूर शहर यांच्या वतीने आयोजित पत्रपरिषदेत दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण संदर्भात वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार, वनअधिकारी श्रीनिवास रेड्डी यांच्यावर कठोर कार्रवाई करण्याची मागणी करण्यात आली.
वन अधिका-यांच्या अमानुष जाचाला कंटाळून स्वत:वर गोळी झाडून दीपाली चव्हापण यांनी आत्महत्या केली होती. ही घटना संपूर्ण भारतात खळबळ उडवणारी असून स्त्रिच्या जातीला लाजीरवाणी बाब आहे. दीपाली चव्हाण यांच्यावर खोटी एट्रॉसिटी दाखल करणा-यांवरही कारवाई करावी. दिपाली चव्हाण यांची मानसिक, शारीरिक व आर्थिक पिळवणूक, झाल्याने त्यांचे मनोबल खच्ची झाले. त्यामुळे दिपाली चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी हिला आत्महत्या करावी लागली. या आत्महत्येस प्रवृत्त करणारे विनोद शिवकुमार व त्यांच्या पाठीशी असलेले वरिष्ठ अधिका-यांवर कडक कारवाई करावी व न्याय मिळावा अशी मागणी पत्रपरिषदेत करण्यात आली. यावेळी अध्यक्ष दिलीप धंद्रे ,सौ. कविताताई भोसले राष्ट्रीय कार्यकारी प्रतिनिधी, अखिल पवार, विजय काळे, तेजसिंग मोरे व गांवडेताई यांची उपस्थिती होती. या प्रकरणांमध्ये कारणीभूत असलेल्या सर्वच अधिका-यांवर खुनाचा गुन्हा दाखल करून, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला दाखल करून, लवकरात लवकर दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे.