शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी दारूचे दुकान व मांसविक्रीचे दुकान बंद ठेवण्यात यावे

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7874*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

235

शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी दारूचे दुकान व मांसविक्रीचे दुकान बंद ठेवण्यात यावे

-नागपूर भारतीय विद्यार्थी सेनेनी केली मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथी अनुसार जयंतीनिमित्तला आज ३१ मार्चला दारूचे दुकान व मांसविक्रीचे दुकान बंद ठेवण्यात यावे. तसेच शासकीय सुट्टी घोषित करण्यात यावी. अशी मागणी नागपूर भारतीय विद्यार्थी सेनेनी केलेली आहे. आज पालकमंत्री मा. नितीन राऊत यांना व उप जिल्हाधिकारी रवींद्र खजांची यांना निवेदन भारतीय विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख डॉ. रामचरणजी दुबे यांच्या मार्गदर्शनात शहर प्रमुख सचिन बा. शर्मा यांच्या नेतृत्वात देण्यात आले. याप्रसंगी उपस्थितीत उपतालुका प्रमुख अजय दुबे महिला आघाडी शहर प्रमुख मीनाताई अडकणे, उपशहर प्रमुख प्रिती ताई लोखंडे, दिनेश वानखेडे , राजु नक्षिणे विभाग प्रमुख रेमो फडणीस, सिरीस फडणीस शांतनू लांजेवार, राहुल लिलारे, सुशील उईके, रजत चव्हाण, साहिल दुपारे आदि पदाधिकारी शिवसैनिकांनी शिव जयंतीला दारूचे दुकान, मांस विक्री दुकान बंद ठेवण्यात यावे. अशी मागणी केली.