एसटी बस-पीकअप व्हॅन अपघातात ३ ठार, १३ गंभीर

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, चंद्रपुर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस व पीकअप वाहनांमध्ये समोरासमोर धडक होऊन पीकअप वाहनचालकासह तीन ठार तर १३ गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास आष्टी-आलापल्ली मार्गावर चौडमपल्ली जवळ असलेल्या चंदनखेडी फाट्यावर घडली. गंभीर जखमींना चंद्रपूर आणि गडचिरोली येथे हलविले आहे. तर ५ किरकोळ जखमींवर आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. ऐन होळीच्या दिवशी घडलेल्या या दुदैर्वी घटनेमुळे आवळगाव, हळदावासीयांवर शोककळा पसरली आहे.
मृतकामध्ये पीकअप वाहनचालक साईरामकृष्ण रमेशबाबू सूर्यदेवरा रा. नारायणबद्रा (२२) रा. तलवाडा ता. कल्लूर, जि. खम्मम, देवाजी खोकले रा. आवळगाव ता. ब्रम्हपुरी (मजूर) अशी जागीच ठार झालेल्याची तर नैना प्रभाकर निकुरे रा. आवळगाव, अर्चना गोकूल आवारी रा. हळदा या दोन महिला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत पावल्या. संतोष पुंडलिक मेर्शाम (२८), ज्योती संतोष मेर्शाम (२३), मधुकर डोमाजी चुधरी (३८), धनराज डोमाजी चुधरी (३५), प्रमिला मधुकर चुधरी (३५) सर्व मु. बोडधा, ता. ब्रम्हपुरी, पुष्पा रेमाजी म्हस्के (३६) रा. डोंगरगाव ता. सावली. कविता चुधरी रा. डोंगरगाव, निराशा सुनील जुमनाके (४0) रा. आवळगाव, शुभम प्रभाकर निकुरे, रा. आवळगाव, तानाबाई आवारी (५0) रा. हळदा, ता. ब्रम्हपुरी, पुष्पा खोकले रा. आवळगाव, कविता चुधरी रा. डोंगरगाव, प्रशांत बंडू भोयर (२८) रा. गेवरा खुर्द ता. सावली. सत्यम सुनील जुमनाके (१८) रा. आवळगाव, ता. ब्रम्हपुरी, सुरेश माधवराव चिंतापारटी रा. चेन्नूर ता. कल्लूर, जि. खममग, कल्पना मारबते रा. डोंगरगाव ता. सावली अशी जखमींची नावे आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील हळदा, बोळधा, आवळगाव आदी गावातील मिरची तोडण्यासाठी तेलंगणा राज्यातील खम्मम जिल्ह्यात गेले होते. रविवारी होळीच्या सण असल्याने ते तेलंगाणा राज्यातून टीएस 0४ युडी ५८४0 या क्रमांकाच्या पीकअप वाहनाने आपल्या गावाकडे जात होते.

You missed