मोहपा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7864*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

279

मोहपा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, प्रतिनिधी-नागपूर : आम्ही भारतीय अभियान द्वारा संचालित देऊ जिवाला जिवाचे दानच्या माध्यमातून महाराष्ट्र नाभिक महामंडळ एकता मंच शाखा मोहपा ता.कळमेश्वर द्वारे आज स्थानिक आंबेडकर चौक येथील नगर परीषद संकुल येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबिराच्या प्रसंगी संत सेना महाराज यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करुन मनाम एकता मंच कळमेश्वर तालुका अध्यक्ष श्री योगेश कापसे,
निलेश मांडवकर- कार्याध्यक्ष, जगदिश पेठे – तालुका सचिव,चंद्रकांत माडंवकर मोहपा शहर अध्यक्ष यांच्या प्रमुख मार्गदर्शनात या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा कार्यकारीनीचे प्रमुख पदाधिकारी म्हणून श्री वैभव तुरक, नितीन पांडे, प्रविण निंबाळकर तसेच संदिप फुकटकर भुषण सवाईकर यांची प्रमुख उपस्थिती प्रसंगी लाभली. रक्तदात्यांपैकी सतीश सुरुसे,मनोज कडवे,देवेंद्र राऊत,अमोल खेडिकर ,हरिश शिरळकर,सचिन शिरळकर,क्रिष्णा मिरासे, किशोर मिरासे ,प्रशांत मिरासे,रोशन मिरासे, विनोद लाडेकर, तुषार कडवे ,मिनल श्रीखंडे, प्रमोद मानमोडे,मनोज भुजाडे,चेतन नेरकर,अल्पित वसानी, सुनिल सेवतकर, दिपक मौजे आशिष व्होरा,आदित्य श्रोते, भूषण शेरजे, नितीन कठाने, सुरज खडसे, विलास वाघाले, आदिंनी रक्तदान करुन मानवतेचा परिचय दिला. शासकीय डागा रुग्णालय रक्तपेढीच्या चमुनू रक्त संकलन करुन प्रतेकांना काळजीपूर्वक उपचार दिला. सर्व रक्तदात्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले.