Home Breaking News कोरोना बाधित रुग्णाचा शौचालयात गुदमरून मृत्यू

कोरोना बाधित रुग्णाचा शौचालयात गुदमरून मृत्यू

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7858*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

153 views
0

कोरोना बाधित रुग्णाचा शौचालयात गुदमरून मृत्यू

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,औरंगाबाद : राज्यात कोरोनाचा कहर वाढत असल्याने प्रशासनावरचा ताणही वाढला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने आता रुग्णांलये अपूरी पडू लागली आहेत. त्यामुळे रुग्णालय प्रशासनावरही ताण येत आहे. औरंगाबादमध्ये जिल्हा रुग्णालयात एका कोरोना बाधित रुग्णाचा शौचालयात गुदमरून मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
औरंगाबदच्या जिल्हा रुग्णालयात एका कोरोना बाधित रुग्णाचा शौचालयात गुदमरून मृत्यू झाला आहे. गुलाबराव ढवळे असे रुग्णाचे नाव आहे. हा रुग्ण तब्बल साडेचार तास आॅक्सिजन विना शौचालयात पडून होता. त्यानंतरही जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने त्यांच्याकडे कुठलेही लक्ष दिले नाही त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.
रुग्ण साडेचार तासापासून परत न आल्याने इतर रुग्णांनी तक्रार केल्यानंतर स्वच्छतागृहात जाऊन तपास घेतला असता. स्वच्छतागृहाचे दार बंद होते. दरवाजा तोडून पाहिल्यानंतर रुग्ण बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसून आले.
रुग्णाची तत्काळ तपासणी केल्यावर त्याचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने रुग्णाकडे लक्ष न दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा रुग्णालयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. दोषींवर कारवाई करण्याची मागणीही नातेवाईकांनी केली आहे.