होळीचे वास्तवकि स्वरूप – सौ. वंदना प्रकाश चावके,पारधीनगर,नागपूर

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7852*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

212

होळीचे वास्तवकि स्वरूप

– सौ. वंदना प्रकाश चावके,पारधीनगर,नागपूर

हिंदू धर्मातील प्रत्येक महिना सनांनी व्यापलेला आहे. प्रत्येक सण, रीतिरिवाज आणि संस्कारामध्ये काही ना काही रहस्य दडलेललं आहे. कि जे आमच्या जीवनात सतत समस्यांचे समाधान करतात. मानसिक आणि आत्मी विकासाचे साधन बनतात. आमच्यातील शारीरिक आणि बौद्धिक उन्नतीसोबतच प्रत्येकाच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळते.
हिंदू संस्कृतिमध्ये सर्व सणांप्रमाणेच होळी हा सण सर्वसामान्यांपर्यंत प्रचलित आहे. शास्त्रानुसार फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या तिथीला होळी हा सण साजरा करण्यात येतो. पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी सूर्यास्त झाल्यानंतर होळी जाळण्याचे शास्त्राचे विधान आहे. हिंदू धर्मातील होळी या सनाची सर्वात मोठी विशेषता ही आहे कि सामाजिक समानतेचे बीज विद्यमान आहे. परस्पारिक प्रेम, उल्हास, हास्य-विनोद, समानता इत्यादी गोष्टी समाजात होळी या सणाद्वारे समाविष्ट होतात. कुठल्याही जातीतील सण-त्यौहार, उत्सवातील इतिहास परंपरेनुसार चालत आलेल्या असतात. पण आजकाल आमच्या देशातील अधिकांश देशवासी सणांचे मुळ तत्व विसरून, उल्ट-सरळ साजरे करून लाभाच्या ठिकाणी नेहमी हानीच लक्षात येते.
होळी सुरुवात केव्हा व कशी झाली याबद्दल जनसामान्यांचे अनेक विश्वास प्रचलित आहेत. भागवत पुराण, विष्णुपुराणातील कथेनुसार बरेचसे लोक होलिका द्वारे प्रल्हादला जाळण्याची घटना सांगतात. एक हिरण्यकश्यपु नावाचा राजा होता. पण त्याच्यात संपूर्ण असुरता, दुर्गुण समाविष्ट होते. त्याने आपले जीवन कुविचार आणि कुकर्मानी व्यापलेले होते. जे त्याच्या संपर्कात , प्रभावात येत होते त्यांना तो वाइट गोष्टीसाठी प्रवृत्त करत होता. हिरण्यकश्यपुची बायको कयाधुच्या पोटात प्रल्हाद असतानाच तो प्रल्हादला मारण्याच्या प्रयत्न करीत होता. शेवटी एके दिवशी कयाधुला नारद भेटले. व ते तिला आश्रमात जाउऊन प्रल्हादला चार वर्षपर्यंत तिने वाढविले.
हिरण्यकश्यपुला मुलगा पोटात असातानाच इंद्राकडून कळले होते की आपल्याला मारायला हा मुलगा येणार. म्हणून तो प्रल्हादला मारण्याचा सतत प्रयत्न करीत होता. हिरण्यकश्यपुचा मुलगा सत्याशी व न्यायाशी लढणारा होता. हिरण्यकश्यपूला वाटत होते की मुलगाही माझ्या म्हणण्यानुसार अनीतीपूर्ण वागेल पण प्रल्हाद हा विष्णुभक्त होता. तो न्यायकारी व विवेकपूर्ण होता. ईश्वर सर्वव्यापी आहे. असे प्रल्हादचे म्हणणे होते. हिरण्यकश्यपुनी प्रल्हादला तलवार मारणे, पहाडावरून पाडणे इत्यादी भरपूर त्रास दिला. शेवटी एके दिवशी हिरण्यकश्यपुची बहीण होलिका सोबत प्रल्हादला अग्नीत जाळले. होलीका जळली पण भक्त प्रल्हाद जिवंत राहिले. शेवटी प्रल्हादल्या लोखंडाच्या खांबाला बांध्ूान हिरण्यकश्यपुनी मारएयाचा प्रयत्न केला पण परमेश्वरांनी प्रल्हादची सुटका करून ईश्वर सर्वव्यापी असल्याचे सिद्ध करून नृसिंह अवतार प्रकट झाला. याचवेळेस नृसिंहच्या हस्ते हिरण्यकश्यपुचा मृत्यु झाला. जेव्हा होलिका अग्नीत जळली तेव्हापासून होळी हा सण साजरा होतो असे म्हणतात. दुसरी पौराणिक कथा म्हणजे ढुढला नावाची राक्षसीनने शिव-पार्वतीची तपस्या करून वरदान मिळविले होते की तिच्यातील असुर,नर,नाग इत्या. कडून तिला लहान मुलगा मिळेल. तेव्हा तो खाउन टाकेल.पण वरदान द्यायच्या वेळेस भगवान शपंकरांनी एक शर्यत लावली की केवळ होळीच्या दिवशी हे वरदान फलीभूत, निष्काम होईल. अनेकांचे अनेक मत. कदाचित म्हणूनच लहान मुले वाटेल तिथून लाकडे गोळा करून होळीत टाकत असेल. या दिवशी लहान मुलांच्या गोष्टी क्षम्य असतात. पूर्वी स्त्रिया शेणाच्या विविध कृती करून होळी मध्ये जाळायच्या पण आता हा प्रकार बंद झाला आहे. शास्त्रानुसार धूप, दीप, नैवेद्य, पुष्पद्वारे पूजा करतात.  या दिवशी लहान-मोठे,उच्च-नीच, सर्व गोष्टीं सोडून सर्व जन खुल्या अंतकरणाने एक-दुस-यांना भेटतात. हिंदू धर्मातील जातीपातीचे जे घातक विष व्याप्त आहे ते होळीच्या दिवशी प्रेम प्रसारांनी नष्ट होतात. विचारपूर्वक किंवा संगठन, एकतेला सुदृढ बनविण्यासाठी सिद्ध होते. वास्तविकपणे होळी हा सण एक असा सण आहे कि वसंतऋतूत येउऊन थंडी संपून गर्मीचे आगमन होते. रुतुपरिवर्तनातील रोगापासून बचावाकरिता पूर्वी पळसाच्या फुलांचे रंग बनवून याच फुलांचे होळीच्या अग्नीसाठी सुद्धा वापर करण्यात येत होता. ज्यामुळे वातावरणातील किटाणु या वायुमुळे नष्ट होईल व संक्रामक रोगांपासून मुक्ती मिळेल. अलीकडे रासायनीक रंग बनविले जातात. ज्यामुळे रोगराईला आमंत्रण मिळते.
काही लोक होळीच्या दिवशी एकतेशिवाय केवळ वैमनस्य वाढवितात. उदा. बरेचसे लोकं नशा करून, भांग, दारू इत्यादीचे सेवन करून झगडे वाढवितात. तर कुठे शिव्यागाळ मारहाण करून काही प्रमाणात हत्या सुद्धा घडतात. वास्तविकता होळीचा संदेश हा आहे कि स्वतातील वाइट प्रवृत्ती दूर करणे, बाहेरची गंदगी साफ करून शुद्धतेचे वातावरण निर्माण करने, चैत्रातील ऋतुपरिवर्तनातील गंदगी विकृत रूप धारण करून बिमा-या घेउऊन येतात. मानसिक दोष,दुर्गण हटविणे ही काळाची गरज आहे. सध्याच्या काळात कोरोनाच्या अतिशय वाढता प्रादुर्भावातून शासनाच्या म्हणण्याप्रमाणे होळी साजरी व्हायला पाहिजे.
00000ं