Home नागपूर स्वातंत्र्यासाठी बलिदान देणा-या शहिदांना नाभिक समाजातर्फे रक्तदानातून मानवंदना

स्वातंत्र्यासाठी बलिदान देणा-या शहिदांना नाभिक समाजातर्फे रक्तदानातून मानवंदना

0
स्वातंत्र्यासाठी बलिदान देणा-या शहिदांना नाभिक समाजातर्फे रक्तदानातून मानवंदना

स्वातंत्र्यासाठी बलिदान देणा-या शहिदांना नाभिक समाजातर्फे रक्तदानातून मानवंदना

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-नागपूर : भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या काळात २३ मार्च १९३१ ला क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना इंग्रजांनी फाशीची शिक्षा दिली होती. या महान देशभक्तांच्या सन्मानार्थ समस्त भारत वर्षात हा दिवस *शहीद दिन* म्हणून साजरा केला जातो. याचे स्मरण राखून आकाशझेप फाऊंडेशन रामटेक द्वारा संचालित आम्ही भारतीय अभियान अंतर्गत महाराष्ट्र नाभिक महामंडळ एकता मंच नागपूर व इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने आयजीएमसी रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी २७ व्यक्ती द्वारा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देणा?्या शहिदांना रक्तदानातून मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी मनामचे विर्दभ प्रांत अध्यक्ष श्याम आस्करकर व आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे संस्थापक यांच्या प्रमुख उपस्थितीत महामंडळाचे पदाधिकारी वैभव तुरक, राजेन्द्र फुलबांधे, विनेश कावळे, विनोद जमदाडे, राजू चिंचाळकर यांनी रक्तदान करुन शिबिराला सुरूवात केली.
या शिबिरात महिलांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद देत चेतना सातपुते(मिराशे) ज्योती अहिरवार, तेजल आडतिया यांनी रक्तदान केले. मनाम एकता मंच परीवार तर्फे सर्वश्री प्रवीण निबाळकर, नितिन पांडे,ओमप्रकाश इंगळे, रवींद्र लक्षने, विवेक तळखंडे, वैभव नक्षणे, सुनील येवले, रमेश वाटकर, राजेश पारधी, निखिल येवले, नितिन ढाले, पंकज कानेटकर, स्वप्निल तळखंडे, धनंजय चिंचाळकर, पियुष तळखंडे, सचिन काष्टी, अनिकेत दहेकर, निलेश तळखंडे, सचिन लाकूडकर, तेजस कान्होलकर,आशिष नक्षणे, रोशन खंडाते, शरद पवार व साक्षोधन कडबे आदिंनी रक्तदानाचे कर्तव्य बजावित शहिदांना मानवंदना दिली. कोरोनाच्या संकट काळात गरजवंतांच्या मदतीला धावून जात जिवाची बाजी लावत आपले सामाजिक योगदान देणा?्या मनाम एकता मंच पदाधिकारी यांना आकाशझेप फाऊंडेशन द्वारा कोव्हिड योद्धा सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयजीएमसीचे समाजसेवा अधिक्षक चेतन मेश्राम, बीटीओ डॉ. समीक्षा गणवीर, सिस्टर वंदना भगत, तंत्रज्ञ अनिल भोरकर व रक्तपेढी चमूने प्रयत्न केले. यावेळी मनाम एकता मंच नागपूरचे जिल्हाध्यक्ष वैभव तुरक यांनी सर्वांचे आभार मानले.