गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय पुस्तक भेट

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7803*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

270

गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय पुस्तक भेट

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-नागपूर : शिवप्रबोधन आयोजन समिती, नागपूरच्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय पुस्तक या उपक्रमात प्रमोद सुरतकर यांनी ११वी व १२ वी सायंस आणि राजाभाऊ जाधव यांनी ५ वी सीबीएससीची पुस्तके भेट दिली. त्याबद्दल शिवप्रबोधन तर्फे त्यांचे आभार मानण्यात आले.
कोरोना च्या महामारीमुळे, संपुर्ण भारत देशातील जनता आर्थिक महामारीला सुद्धा पुढे जात, अतिशय मोठ्या प्रमाणात लोकांचे रोजगार समाप्त झालेले आहेत, प्रत्येक व्यक्ती आयुष्यात हाच विचार करित असतो की आपले मूल चांगले शिक्षण घेऊन नौकरी पेशाला लागावेत, या करिता गरिबातील गरीब सुद्धा मोठ्या प्रमाणात झटत असतो व आपल्या मुलाच्या शिक्षणात तो कधीच खंड पडू देत नाही, पण आज लोकांचे दोन वेळेसच्या जेवणाचे सुद्धा कठीण झाले आहे. भरपूर सामाजिक संस्था दरवर्षी गरीब मुलांना मोफत पुस्तके देतात, पन कोरोनाच्या संकटकाळ? त्यांची सुद्धा आर्थिक परिस्थिती डबघालीस आलेली आहे, त्यावर एकमेव उपाय हाच आहे की जी पुस्तके ज्याची बाजारात किंमत 3 ते 4 हजार ती आपण रद्दीत फक्त पाच दहा रुपयात विकून टाकतो ती पुस्तके जर आपण आपल्या शाळेत जमा केलीत तर प्रत्येकाला त्याचा फायदा होईल व थोडीफार आर्थिक विवनचनेतून सुटका होईल.