विद्यार्थ्यांचे मागील वर्षीची शालेय पुस्तके जमा करून नवीन विद्यार्थ्यांना मोफत द्या!

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7797*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

254

विद्यार्थ्यांचे मागील वर्षीची शालेय पुस्तके जमा करून नवीन विद्यार्थ्यांना मोफत द्या!

-शिवप्रबोधन आयोजन समितीची मागणी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-नागपूर : नागपूर शहरातील खाजगी तसेच सरकार अनुदानित सर्व शाळांमधील सर्व संस्था चालकांना तसेच मुख्याध्यापकांना कळकळीची विनंती आहे की, कोरोनामुळे प्रत्येकाला आर्थिक चणचण मोठ्या प्रमाणात येत आहे, या संकट काळात, मानवतेच्या व माणुसकीच्या माध्यमातून एकमेकास मदत करणे आवश्यक आहे. शिवप्रबोधन आयोजन समिती, नागपूरच्या वतीने सर्व संस्था चालकांकडून एक मदतीची अपेक्षा ठेवत शाळेतील, प्रत्येक विध्यार्थ्यांची मागील वषीर्ची जुनी पुस्तके शाळेत गोळा करून व ती सैनिटाइज करून नवीन विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध होईल या करिता जागृत करावे, जेणे करून या शैक्षणिक वर्षात, पालक वर्गाला निदान पुस्तकाचा खर्च वाचविता येईल. याकरिता सर्व संस्था चालकांनी एक सामाजिक बांधिलकीची भावना ठेऊन, या परमपुण्य विद्यादानाच्या कार्यात सक्रिय व्हावे अशी विनंती शिवप्रबोधन आयोजन समितीचे हेमंत भोसले, प्रकाश खंडागळे, नवीन चव्हाण यांनी केली आहे.