लॉकडाउननंतर आम आदमी पार्टीने वीजबिलाचा प्रश्न सतत उचलून धरला.

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7778*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

176

लॉकडाउननंतर आम आदमी पार्टीने वीजबिलाचा प्रश्न सतत उचलून धरला.

-नागपुरात वाढीव वीजबिला विरोधत आम आदमी पार्टीचा केजरीवाल पॅटर्न

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-नागपूर : 25 मार्च रोजी दुपारी 2.30 वाजता राजेश बंडे, मंगळवारी यांच्या घरचे महावितरणने कपलेले वीज कनेक्शन आम आदमी पार्टीने जोडण्याचे प्रयास केले. पोलिसांनी वीज कनेक्शन जोडू दिले नाही. राजेश बंदे यांनी 24 मार्चला वीज कनेक्शन कापल्यामुळे आत्मदाहाचा प्रयत्न केला. वीज उपभोक्ता घरमालक हफ्ते बांधन्याची मागणी करीत पैशे भरण्यास तयार आहे, तरीही महावितरण ने वीज कापली. लॉकडाउनमुळे लोकांचे व्यवसाय अस्ताव्यस्त झाले आहेत. कोरोना काळात लोकांची आर्थिक परिस्थिती खूप विकट आहे. राज्य सरकार लोकांन कडून वीजबिल बळजबरीने वसूल करत आहे. राज्य सरकारची कोरोना काळात असंवेदनशीलता दिसून येते. आता नागपुरमध्ये परत लॉकडाउन लागले आहे, अश्या परिस्थितित लोक पैसे भरण्यास असमर्थ आहेत.
लॉकडाउननंतर आम आदमी पार्टीने वीजबिलाचा प्रश्न सतत उचलून धरला. यात वाढीव वीजबिलाच्या होळी जाळन्यापासून, महावितरणच्या आॅफिसला कुलुप ठोकेपर्यंत व मुख्यमंत्री यांच्या विरोधात पुलिस तक्रार असी अनेक आंदोलने केले. आता कापलेले वीज कनेक्शन आम आदमी पार्टी जोडणार व या वीजबिल आंदोलनाला पुढे राबविणार असा निश्चय आपने केला आहे.
आज राजेश बंडे, मंगळवारी येथील वीज कनेक्शन आंदोलनात गिरीश तितरमारे, प्रदीप पौनिकर व प्रभात अग्रवाल, यांची प्रमुख भूमिका होती. या मोहिमीत नागपुर विदर्भ संयोजक देवेंद्र वानखड़े, संयोजक कविता सिंघल, संघटन मंत्री शंकर इंगोले, सचिव भूषण ढाकूलकर, नागपुर युवा संयोजक गिरीश तितरमारे, मध्य नागपुर संगठन मंत्री प्रभात अग्रवाल, उत्तर नागपुर संयोजक रोशन डोंगरे, विनोद गौर, प्रतीक बावनकर, हेमंत पांडे, अक्षय दुपारे, अविनाश पेंढारकर, मनोज बतवे, सुनील कोटाँगे, योगेश पराते, जगदीश रोकड़े आणि अन्य कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.