Home नागपूर नरखेड तालुक्यात सरकारी मालमत्तेचे स्टोनक्रशरच्या माध्यमातून अवैधरित्या उत्खनन व परिवहन

नरखेड तालुक्यात सरकारी मालमत्तेचे स्टोनक्रशरच्या माध्यमातून अवैधरित्या उत्खनन व परिवहन

0
नरखेड तालुक्यात सरकारी मालमत्तेचे स्टोनक्रशरच्या माध्यमातून अवैधरित्या उत्खनन व परिवहन

नरखेड तालुक्यात सरकारी मालमत्तेचे स्टोनक्रशरच्या माध्यमातून अवैधरित्या उत्खनन व परिवहन

– शासनाच्या नियमाचे सर्रास उल्लंघन,प्रशासन साखर झोपेत.

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-राहुल कान्होलकर : नरखेड तालुक्यात असंख्य स्टोन क्रेशर असून त्यांना शासनाने आखलेल्या नियमावलीनुसार उत्खनन करण्याची मुभा आहे.परंतु नियमावलीचे पालन न करता अवैधरित्या उत्खनन करणे चालू आहे व त्यातून निघालेल्या संपत्तीची अवैधरित्या वाहतूक होत आहे. त्यामुळे रस्त्याची दुर्दशा,अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तसेच क्रेशरच्या धुळीमुळे आजूबाजूला असलेल्या शेतक-याच्या पिकाचे नुकसान होत आहे. याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांनी या सर्व गोष्टीची शहानिशा करून तात्काळ क्रेशर बंद करून अवैधरित्या होणारे उत्खनन थांबवण्याची मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार यांना केली आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नागपूर जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष नरेश भोयर,तालुका सचिव साजिद पठाण,विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष रितेश कान्होलकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.