जनता अंधारात – उर्जामंत्री करोडोंच्या घरात? वीजबिलासंदर्भात जनता आक्रमक

343

अजय बिवडे, संपादक – विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – मागील वर्षभरापासून सुरू असलेला कोरोना प्रकोप अद्यापही संपुष्टात आलेला नाही़ सरकारच्या दुकाने बंदचा आदेश कधी येईल हेही सांगता येत नाही़ अशातच मागील वर्षभरापासून थप्प पडलेले उद्योगधंदे व अनेकांचे गेलेले रोजगार यामुळे सामान्य जनतेच्या डोक्यावर फक्त आणि फक्त संकटाचे ओेझेच आहे़ अशावेळी दाद मागावी तर कुणाकडे हाही प्रश्न डोळ्यांपुढे आसावलेला आहे़ महाराष्ट्र राज्याला ऐतिहासिक पार्श्वभुमी आहे़ छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत ‘जनता प्रथम’ अणि जनतेचे रक्षण हा संकल्प डोळ्यापुढे ठेऊन स्वराज्य निर्माण करणाºया शिवछत्रपतींनी जनतेला प्रथम स्थान दिले़ जनतेवर आलेल्या संकटाचा पुढाकाराने सामना करीत रक्षण करणाºया छत्रपतींच्या राज्यात आज जनतेची अतिशय बिकट परिस्थीती असतांना त्याच जनतेच्या पाठीशी आज कुणी वाली नाही असेच म्हणावे लागेल?
वर्षभरापासून व्यवसाय थप्प आहे़ नौकरदारांच्या पगारातही कपात करण्यात आली़ अशातच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही होताच़ अनेकांनी मिळेल त्या रोजगाराच्या माध्यमातून कुटुंबाचा गाडा खेचला़ एकेकाळी ‘सरकार माय बाप’ म्हणणारी जनता आता ‘ या सरकारचे करायचे काय’ असाही रोष व्यक्त करीत आहे़ उर्जामंत्री नितीन राऊत यांनी विजबिलासंदर्भात दिलासा मिळेल या विधानाने सामान्यांना सकारात्मकता मिळाली होती़ जनतेला याहीपुढे काही सहकार्य करण्यात आले नाही़ आज महागाई सोबतच आर्थिक संकटाचा सामना करीत असणारी सामान्य जनता मात्र आज थेट विजबिल थकवणा-यांचा विजपुरवठा खंडीत करून अंधारात ठेवण्याचे काम हे सरकार करीत असल्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे़ अगोदरच संकटाचा ‘सामना’ करीत असलेली जनतेच्या मनात शासनाप्रती रोष आहे़
काही दिवसांपुर्वीच विरोधी पक्ष असलेल्या भाजपने विजबिलासंदर्भातील शासनाच्या अन्यायाला वाचा फोडून राज्यभर आंदोलन केले़ मात्र याचाही काही परिणाम शासनकर्तांवर झाला नाही़ उर्जामंत्री यांनी आपल्या शासकिय बंगल्याला लावलेला करोडो रूपयांचा खर्च जनतेपुढे काही दिवसांपुर्वीच आला़ राज्यात अनेक पक्षांच्या सत्ता आल्या़ मात्र जनतेची आर्थिक परिस्थीती सुधारेल याची कुणीही दखल घेतलेली नाही़ शेतकºयांच्या बाबतही उदासिनतेचाच पवित्रा राहीलेला आहे़ काल नागपूर शहरातील एका विजधारकाने विजपुरवठा खंडित केल्यामुळे आत्मदहणाचा प्रयत्न केला़ ६० हजारांच्या थकीत बिलामुळे विजपुरवठा खंडीत केला असे महावितरणच्यावतीने सांगण्यात आले असले तरी किस्तीवरही भरणा देय होऊ शकला असता़ महावितरणच्या अधिकाºयांना याविषयी माहिती विचारली असता त्यांनी ‘वरून आदेश आहे’ थकीत असलेल्या धारकांचा विजपुरवठा खंडीत करा असेच काहीसे उत्तर असते़ अशातच आर्थिक संकट व विज तसेच करांच्या वर्तुळात अडकलेली जनता उमेदीने कोणाकडे बघणार किंवा शासनाविरोधात रस्त्यावर उतरून रोष व्यक्त करणार हे वेळच सांगेल़.