वर्षपूतीर्नंतर पुन्हा कोरोना आक्रामक

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7749*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

273

वर्षपूतीर्नंतर पुन्हा कोरोना आक्रामक

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, प्रतिनिधी-नागपूर : मेडिकल रुग्णालयात एक हजार बेड कोविड रुग्णांसाठी आरक्षित करण्यात आले होते. मात्र, रुग्णसंख्या कमी होताच या खाटा नॉन कोविड रुग्णांसाठी देण्यात आल्या. रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांची संख्याही वाढायला लागली. त्यातच आता पुन्हा कोरोना रुग्णदेखील वाढू लागल्याने नॉन कोविड रुग्णांना एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी, खाली असणा-या वॉर्डात हलविले जात आहे. मेडिकलमधील चार ते पाच आयसीयू वॉर्ड फुल्ल आहेत. अन्य रुग्णालयातही अशीच स्थिती आहे.
कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी देशभरात २४ मार्च २0२0 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊन घोषित केला. नंतर टप्प्याटप्प्यात परिस्थिती सुधारत असतानाच बंधने शिथिल करण्यात आली. लॉकडाऊनच्या घोषणेची वर्षपूर्ती होत असताना पुन्हा पूवीर्सारखीच स्थिती पहायला मिळत आहे. नागपुरात दिवाळीनंतर कोरोनाचा प्रकोप काहीसा कमी व्हायला लागला होता. आता पुन्हा कोरोना प्रकोप वाढत आहे. त्यामुळे बंद करण्यात आलेले कोविड केअर सेंटर, मनपाची हेल्पलाईन सुविधा पुन्हा सुरू केली जात असून, रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णालयात खाटांचाही तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.
नागपूर शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. दररोज तीन हजारांच्या वर बाधित आढळून येत आहे. मंगळवारीही (२३ मार्च) तब्बल ३ हजार ९५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर ३३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यात मंगळवारी १४ हजार ९५६ चाचण्या करण्यात आल्या. यापैकी ११ हजार ३७९ चाचण्या आरटीपीसीआर तर ३ हजार ५७७ रॅपिड अँन्टिजेन चाचण्या करण्यात आल्या. यापैकी ३ हजार ९५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात २२७२ जण शहरातील तर ८१९ बाधित हे ग्रामीण भागातील आहेत. ४ जण हे जिल्ह्याबाहेरील आहेत. नागपूर जिल्ह्याबाहेरील व्यक्तीची नागपुरात तपासणी झाल्यास वा बाहेरील बाधितांवर येथे उपचार झाल्यास त्याची नोंद नागपूरच्या आकडेवारीत होते. आतापर्यंत नागपुरात नोंद झालेली कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ९९ हजार ७७१ इतकी झाली आहे. यात शहरातील १ लाख ५८ हजार ७२0 व ग्रामीण भागातील ४0 हजार ४३ बाधित आहेत. १ हजार ८ बाधित हे नागपूर जिल्ह्याबाहेरील आहेत. आतापर्यंत एकूण बाधितांपैकी १ लाख ६३ हजार ८१ बाधित बरे झाले आहेत. यात मंगळवारी बरे झालेल्या २ हजार १३६ जणांचाही समावेश आहे. मंगळवारी नोंद झालेल्या ३३ मृत्यूसह आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ४ हजार ६९७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यात ३00६ मृत्यू शहरातील, ८६५ मृत्यू ग्रामीण भागातील व ८२६ मृत्यू हे नागपूर जिल्ह्याबाहेरील व्यक्तीचे आहे. सद्यस्थितीत ३१ हजार ९९३ इतके अँक्टिव्ह रुग्ण जिल्ह्यात आहेत. यातील २५ हजार ४२ रुग्ण हे कोणतीही तीव्र लक्षणे नसल्याने घरीच उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८१.६३ टक्के इतके झाले आहे.