Home Breaking News एकीशी प्रेम दूसरीशी घरोबा, कचाट्यात अडकला कामांध नवरोबा

एकीशी प्रेम दूसरीशी घरोबा, कचाट्यात अडकला कामांध नवरोबा

0
एकीशी प्रेम दूसरीशी घरोबा, कचाट्यात अडकला कामांध नवरोबा

एकीशी प्रेम दूसरीशी घरोबा, कचाट्यात अडकला कामांध नवरोबा

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, प्रतिनिधी-नागपूर : विद्यापीठाच्या वाचनालयात त्यांची ओळख झाली. ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. शरीरसंबंध निर्माण झाले. पण, प्रेयसीला धोका देऊन त्याने दुस-या मुलीशी साक्षगंध उरकले. प्रेयसीला कळताच तिने अत्याचाराचा आरोप लावत त्याची नवीन कामठी पोलिस ठाण्यात तक्रार केली. धर्मदास उत्तमराव गेडाम रा. शिवनी पाईली, ता. चिमूर, चंद्रपूर असे आरोपी मुलाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, नवीन कामठी येथे राहणा-या युवतीने २0१९ मध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यापीठात दाखला घेतला. विद्यापीठाच्या वाचनालयात ती अभ्यास करायची. दरम्यान, तेथे तिची धर्मदाससोबत ओळख झाली. ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. त्यांचे प्रेम चांगलेच बहरत गेले. तिचा वाढदिवस असल्याची संधी साधत तो तिला वाढदिवस साजरा करण्यासाठी फिरायला म्हणून शेगाव येथे घेऊन गेला. तेथे एका हॉटेलमध्ये ते थांबले. तेथे धर्मदास याने तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला. तिने विरोध केल्यावर त्याने लग्नाचे आमिष देऊन वेळ मारून नेली आणि आता त्याने दुस-या मुलीशी सूत जुळविले. त्याचे लग्न ठरल्याचे फियार्दी मुलीला समजताच तिने हा प्रकार त्या मुलीला सांगितला. त्यामुळे त्या मुलीने आणि तिच्या घरच्यांनी लग्न मोडले. त्यानंतर धर्मदासने दुस-या मुलीशी साक्षगंध केले. त्याचे ४ एप्रिलला लग्न आहे. पीडित मुलीला माहिती मिळताच तिने नवीन कामठी पोलिस ठाणे गाठत धर्मदासविरुद्ध अत्याचाराची तक्रार नोंदविली.