नागपूर शहरात वीज कापण्याच्या विरोधात आम आदमी पार्टीचा वीज जोडा अभियान

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7735*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

215

नागपूर शहरात वीज कापण्याच्या विरोधात आम आदमी पार्टीचा वीज जोडा अभियान

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, प्रतिनिधी-नागपूर : जवाहर नगर येथील राजेश तिवारी यांचे कापलेले वीज कनेक्शन आपच्या कार्यकर्त्यांनी जोडले. यावेळी विदर्भ युवा संयोजक पीयूष आकरे, राज्य युवा समिति सदस्य कृतल वेलेकर, दक्षिण नागपुर संघटन मंत्री मनोज डफरे, सचिव सचिन पारधी, डॉ. संजय जीवतोडे, अमोल मुळे, संजय अनासाने, शुभम पराळे, विकास नगराळे, अमोल गिराडे अन्य कार्यकर्ता व पदाधिकारी हजर होते.
मंगळवारी सकाळी १०.३० वाजता महावितरण मानेवाडा उपविभाग तर्फे सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात ६ कर्मचारी यांनी राजेश तिवारी, जवाहर नगर, मानेवाडा रोड यांचा वीज पुरवठा कोणत्याही सूचना न देता खंडित करण्यात आला. या बेकायदेशीर कार्यवाहीची तक्रार हुडकेश्वर पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलीस निरीक्षक द्वारे सरकारी नौकर वर कार्यवाही करण्यास नकार देण्यात आले. पोलीस द्वारे महावितरण कर्मचा-यांंना वाचविण्याचे प्रयत्नामुळे असे दिसून येते कि सरकार जनतेला खोटे आश्वासन देते आणि अधिका-यांना पाठवून जोर जबरदस्तीने वीज पुरवठा बेकायदेशीर कापण्याचा अधिकार दिला आहे. जनतेचे कापलेले विज नागपूर आम आदमी पार्टी तर्फे जोडले जाईल असा निर्धार आप पार्टी ने केला आहे.

—————