भारतीय जनता पार्टी दक्षिण पश्चिम महिला आघाडीच्या कार्यकारिणीची घोषणा

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, प्रतिनिधी-नागपूर : नागपूर भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण-पश्चिम महिला आघाडीची कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली असून भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा वर्षा दिलीप चौधरी यांची निवड करण्यात आली. मा.नितीनजी गडकरी (केंद्रीय मंत्री), देवेंद्रजी फडणवीस(माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेता), प्रवीणजी दटके (शहर अध्यक्ष आमदार), राजीव हडप (दक्षिण पश्चिम मंडळ पालक), संदीप जोशी (माजी महापौर), मुन्नाजी यादव (माजी अध्यक्ष कामगार मंडळ), किशोरजी वानखेडे (दक्षिण पश्चिम मंडळ अध्यक्ष), आशिष पाठक (शहर संपर्क मंत्री), अश्विनीताई जिचकार (प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस), नीताताई ठाकरे (महिला मोर्चा शहर अध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनात दक्षिण पश्चिम महिला आघाडीची घोषणा करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे हार्दिक अभिनंदनाचा वर्षाव होत आहे असे कळविले आहे.

You missed