Home नागपूर रुग्णाची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले यांचे समाधान अनमोल आहे : आ. राजू पारवे

रुग्णाची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले यांचे समाधान अनमोल आहे : आ. राजू पारवे

0
रुग्णाची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले यांचे समाधान अनमोल आहे :  आ. राजू पारवे

रुग्णाची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले यांचे समाधान अनमोल आहे :
आ. राजू पारवे

– रुग्ण सहाय्यता कक्षच्या माध्यमातून 6 रुग्णांवर केली शल्यक्रिया

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-नागपूर : गोर गरिबांच्या मदतीला तत्पर असणारे उमेरड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजुभाऊ पारवे यांच्या रुग्ण सहाय्यता कक्षच्या माध्यमातून 6 गरजू रुग्णांवर शल्यक्रिया करण्यात आल्या.
यात प्रतीक पडोळे सिल्ली, वय वर्ष 12 हा आपल्या गावात मित्रांसोबत खेळत होता. अचानक तोल गेला आणि पडला. यात त्याच्या हाताचे कोपरा असलेले हाड तुटले. इकडे तिकडे औषध घेतले पण शस्त्रक्रिया शिवाय दुसरे पर्याय नव्हते. शस्त्रक्रिया महागडी होती. यामध्ये सिल्ली येथील अंबादास लांजेवार व कुही येथील मयूर तळेकर यांच्या माध्यमातून आमदार साहेबाना या विषयाची माहिती मिळाली. त्यांच्या माध्यमातून नागपूर येथील खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. याचप्रमाणे वंदना फुलझेले, भिवापूर व कुही येथील वैशाली लांजेवार यांचे अपेनडिक्सचे आॅपरेशन करण्यात आले. उज्वला पिल्लेवान यांची गर्भाशय शस्त्रक्रिया, कुही येथील चंद्रभान उरकुडे यांचे पायाचे हाड तुटलेले असताना शस्त्रक्रिया करण्यात आली. ज्ञानेश्वर जायसवाल, भिवापूर यांना लघवीचे आजार असल्याने शल्यक्रिया करण्यात आली. या सहाही रुग्णांचे शस्त्रक्रिया आमदार राजू भाऊ पारवे यांच्या रुग्ण सहायता कक्षच्या माध्यमातुन करण्यात आले.
या सर्वांच्या नातेवाईक यांनी आमदार महोदयांच्या कायार्चे कौतुक करून आभार सुद्धा मानले.
सोमवारला 22 मार्च ला आमदार राजूभाऊ पारवे यांचा जनसंपर्क कार्यालयात उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ पारवे यांना भेटून तानाबाई पाटील, बोटेझरी यांचे काही दिवसा अगोदर अपेंडीक्सचे मोफत आॅपरेशन करून दिल्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांनी परवे साहेबांचे मन:पूर्वक आभार मानले व अशी सेवा आपल्या कडून घडत राहो, अशी अपेक्षा व्यक्त केली.