
विदर्भ वतन न्युज पोर्टल, मुंबई: आघाडी सरकार स्थापन झाले तेव्हापासून त्यांच्यामागे संकटेच लागलेली आहे असेच म्हणावे लागेल़ पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला, तर आता मुंबईचे माजी पोलिस आयुक्तांच्या लेटर बाँम्बने राज्यातील राजकारण अधीकच पेटले आहे़ यापुढेही पुन्हा एक आरोप महाविकास आघाडी सरकारवर लागलेला आहे़ परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर राज्य सरकारच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारविरोधात आघाडीच उघडली आहे. पोलीस दलातील बदल्यांचे रॅकेट व फोन टॅपिंगचे पुरावे देऊनही त्यावर कारवाई न झाल्यानं फडणवीस दिल्लीत तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. ते आजच दिल्लीला जाणार असून केंद्रीय गृहसचिवांना आपल्याकडील पुरावे देणार आहेत. या संपूर्ण प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी ते करणार आहेत. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आज ही माहिती दिली. ‘पोलीस दलातील गैरप्रकार व बदल्यांच्या रॅकेटबद्दल तक्रार करणारे परमबीर सिंग हे पहिले अधिकारी नाहीत. त्याआधीच्या पोलीस महासंचालकांनीही पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटच्या संदर्भात एक अहवाल राज्य सरकारला दिला होता. माझ्याकडे त्यावेळच्या गुप्त अहवालाची प्रत आहे. याशिवाय, ६.३ जीबीचा डेटा आहे. त्यात सर्व प्रकारच्या संभाषणाचा पुरावा आहे,’ असे फडणवीस म्हणाले.’बदल्यांच्या रॅकेटची संपूर्ण माहिती सुरुवातीला पोलीस महासंचालकांना देण्यात आली होती. त्यांनी दुसºयाच दिवशी ती अतिरिक्त गृह सचिवांकडे पाठवली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील ही सगळी माहिती देण्यात आली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारने या गंभीर व संवेदनशील प्रकरणाकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. उलट त्यांनी गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुखांचीच बदली करून टाकली. शिवाय, रॅकेटमध्ये नाव असलेल्यांना त्याच जागी पोस्टिंग देण्यात आली,’ असा आरोप फडणवीस यांनी केला. ‘ही सर्व माहिती मी केंद्रीय गृहसचिवांना देणार आहेत. यात आयपीएस, आयएएस अधिकाºयांसह काही राजकीय नेत्यांचाही समावेश असल्याने याची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करणार आहे,’ असे फडणवीस यांनी सांगितले़

