बोगस पत्रकारांवर आळा घाला,पत्रकार संघाची मागणी

327

जिल्हाधिकारी व पुलिस अधीक्षक यांचे नावे तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन
विदर्भ वतन न्युज पोर्टल, राधाकिसन चुटे,आमगाव प्रतिनिधी :- संपूर्ण जिल्ह्यात व तालुक्यासह ग्रामीण भागात काही लोक पत्रकारितेच्या नावाखाली विविध उद्योग करीत असल्याने प्रतिष्ठित पत्रकार बदनाम होत आहेत करिता या पत्रकारांवर आळा घालण्यात यावा या करिता गोंदिया जिल्हा मराठी पत्रकार संघाशी संलग्न आमगाव तालुका पत्रकार संघाच्यावतीने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी व पोलीस निरीक्षक यांचे मार्फत पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले.
आमगाव तालुका पत्रकार संघाचेवतीने निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण जिल्ह्यात खाजगी वाहनांवर प्रेस लिहलेले व आॅनलाईन मीडिया च्या नावाखाली कसलाही नोंदणी नसलेले स्वयं घोषित काही लोक नागरिक व अधिकाºयांमध्ये आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत व तसेच युट्यूब वर चालणारे चॅनलचे पत्रकार निर्माण झाले आहेत. कोणत्याही वृत्तपत्रांमध्ये काम न करणारे व केवळ संकेत स्थळावर चुकीचे लिखाण करून नागरिकांना व अधिकाºयांवर वचक ठेवण्याचा प्रकार हे बोगस पत्रकार करीत असल्याचे दिसून येत आहे़ तसेच सूचना व प्रसार मंत्रालयात नोंदणी नसलेले युट्यूब वर अनेक चॅनल सुरू आहेत यामुळे समाजावरील होणाºया अन्यायाचा वाचा फोडणारे सर्व सामान्यांची बाजू मांडणारे पत्रकार बदनाम होत आहेत. तरी यांच्यावर आळा घालण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन सादर करतेवेळी आमगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष – इसुलाल भालेकर, सचिव – राधाकिसन चुटे, कोषाध्यक्ष – सुनिल क्षिरसागर, राजीव फुंडे, नरेंद्र कावळे, रितेश अग्रवाल, रेखलाल टेंभरे, महेश मेश्राम, विकास शर्मा, आनंद शर्मा, इत्यादी पत्रकार उपस्थित होते.