Home नागपूर जागतिक कविता दिन अभूतपर्व उत्साहात संपन्न

जागतिक कविता दिन अभूतपर्व उत्साहात संपन्न

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7683*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

212 views
0

जागतिक कविता दिन अभूतपर्व उत्साहात संपन्न

-जवळपास 10000 प्रेक्षकांची उपस्थिती)

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-मुंबई : जाई फाउंडेशन मुंबई नों.क्र. महा. ४९/२०२१ द्वारा संचालित शब्दवेल साहित्य मंच फेसबुक समूहावर 21 मार्च जागतिक कविता दिना निमित्त ‘कवी, कविता आणि आपण’ या विषयावर संवादमय काव्यमैफिल आयोजित करण्यात आली. यामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक रवींद्र लाखे,ज्येष्ठ कवयित्री भारती बिर्जे-डिग्गीकर, ज्येष्ठ साहित्यिका अनुवादिका जयश्री हरी जोशी, सुप्रसिद्ध कवी मा.संजय चौधरी,नाशिक हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे साजेशे निवेदन शब्दवेल परिवाराचे कविवर्य अरुण म्हात्रे यांनी आपल्या बहारदार शैलीत केले.
याप्रसंगी एकापेक्षा एक बहारदार कवितेवरील कविता त्याचबरोबर एकंदरीत कवितेचा आणि आपला संबंध याचे अभ्यासपूर्ण विवेचन प्रमुख मान्यवरांनी केले. जवळपास दहा हजाराच्यावर रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. विविध 293 साहित्यिक फेसबुक समूहावर एकाचवेळेस हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. या उदंड प्रतिसादाबद्दल शब्दवेल साहित्य मंचाचे अध्यक्ष प्रवीण ज.बोपुलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. श्रोत्यांच्या आग्रहाच्या विनंतीला मान देऊन लवकरच या कार्यक्रमाचा दुसरा भाग प्रसारित करण्यात येईल असे आश्वासन यावेळी कविवर्य अरुण म्हात्रे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शब्दवेल परिवाराचे मुख्य कार्यकारिणी सदस्य नरेंद्र लोणकर,प्रविण सोनोने,रंजना कराळे,शीतल राऊत, विद्या ताई अटक (पुणे जिल्हाध्यक्षा),व्यवस्थापिका अश्विनी अतकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.