लग्न समारंभात दोन गटात हाणामारी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7677*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

353

लग्न समारंभात दोन गटात हाणामारी

-वर पक्षाकडील एकाचा मृत्यु
विदर्भ वतन, प्रतिनिधी-नागपूर : लग्न समारंभ आटोपल्यानंतर वर व वधू पक्षाकडील मंडळीत क्षुल्लक कारणावरून वाद उद्भवला. नंतर या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. या मारहाणीत वर पक्षाकडील एकाला गंभीर मार बसला. त्याला उपचारासाठी नागपूरला नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. सदर घटना रविवारी (२१ मार्च) चार वाजताच्या सुमारास तालुक्यातील पाहमी येथे घडली.
अश्?विन नरेश टेंभरे (३५), रा. नागपूर असे मृतकाचे नाव आहे. पाहमी येथील पंजाब पिल्लेवान यांच्या मुलीचे लग्न नागपूरच्या डिफेन्स परिसरात राहणा-या मुलाशी ठरले होते. रविवारी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान लग्न सोहळा आटोपला. जेवन सुरू असताना दोन गटात अचानक वाद निर्माण झाला. हा वाद वाढत गेला. गावातील काही सुज्ज्ञ मंडळींनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. परंतु, नवरदेवाकडील वाद घालणारे हे दारूच्या नशेत असल्याने त्यांच्यावर समजाविण्याचा काहीच परिणाम झाला नाही. अशातच वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यात दोन्ही पक्षाकडील मंडळींपैकी काहींना किरकोळ तर काहींना जबर मार बसला.
वाद निर्माण करून तो वाढविण्यात मृतक अश्विन टेंभरे याचा मोठा हात होता, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शिनी दिली. त्याला गावक-यांनी समजाविण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, अधिकच दारू प्यालेला असल्याने समजावण्याचा त्याच्यावर काहिही परिणाम झाला नाही. शेवटी त्याला कसेतरी नवरदेवाच्या वाहनात बसवून घटनास्थळावरून नेण्यात आले. दरम्यान, प्रकृती बिघडल्याने त्याला उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उमरेडवरून नागपूरला नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला.
सायंकाळी साडेपाच वाजतादरम्यान घटनेची सूचना भिवापूर पोलिसांना मिळाली. एपीआई भस्मे यांनी लगेच पाहमी येथे धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली. मारहाणीत जखमी झालेले वामन डहाके (वय ५४) व त्यांचा मुलगा समीर डहाके (२२), दोघेही रा. पाहमी यांना पोलिस स्टेशनला आणन्यात आले. वृत्त लिहिपर्यंत पोलिसांनी कुणाविरुद्धही गुन्हा नोंदविलेला नव्हता. ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात पुढील कार्यवाही सुरू आहे.