नागपूर जिल्ह्यातील साप्ताहिक बाजार सुरू करावे

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7671*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

736

नागपूर जिल्ह्यातील साप्ताहिक बाजार सुरू करावे

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-नागपूर : भारतीय पथ विक्रेता व असंघठित लघु उद्योग व्यापारी लोक कल्याण संस्थेच्या वतीने रविवारी पत्रपरिषद साप्ताहिक बाजार सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या कोरोना नियंत्रणाच्या संदर्भात साप्ताहिक बाजारामध्ये भरणा-या दुकानदारांना याबाबत शासनातर्फे बंदी करण्यात आली आहे. ती बंदी दूर करण्यात येऊन साप्ताहिक बाजार सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी. जेणेकरून त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावरील उपासमारीची पाळी येऊ नये. तसेच त्यांच्या उपजीविकेचा मार्ग चांगला व्हावा. कळमना मार्केट, कॉटन मार्केट हा दररोज बाजार भरत असतो व कोरोना काळात मार्केट सुरूच आहे. परंतु साप्ताहिक बाजार शासनाच्या आदेशाने बंदच आहे. साप्ताहिक बाजारवाले हे सुद्धा कोरोना नियंत्रणाच्या बाबतीत असलेले नियमाचे पालन करण्यास तयार आहे व करीत आहे. साप्ताहिक बाजार कायमचा सुरू करण्यात यावा अशी संघटनेतर्फे विनंती करण्यात येत आहे.
अशी मागणी भारतीय पथ विक्रेता व असंघठित लघु उद्योग व्यापारी, लोक कल्याण संस्थेचे सचिव, शम्मी रामप्यारे गुप्ता यांनी परिषदेत न्यायाची मागणी सरकारपुढे केली आहे. यावेळी अ‍ॅड.व्ही.एन वंजारी, उपाध्यक्ष किशोर बहोरिया उपस्थित होते.