
थोडं जगायचं राहूनच गेलं …
गर्भ पोटात वाढवतांना
शरीर मात्र सुबक ठेवायच राहून गेलं
आणि घराचं घरपण जपतांना
अख्ख तारुण्य माझं वाहुन गेलं …
आणि हो …
माझं थोडं जगायचं राहूनच गेलं
स्वत:ला वजा करून
जपत गेले सगळ्यांना
आयुष्याच्या गोळाबेरजेत स्वत:ला
अिि करायचं राहून गेलं
आणि हो ….
माझं थोडं जगायचं राहूनच गेलं
वणवण करणारया पाखरांना
हक्काचं घर मिळावं म्हणून
स्वत:च स्वत:मधे गुंततांना
आकाशात उडायचं राहून गेलं
आणि हो ….
माझं थोडं जगायचं राहूनच गेलं
– सौ. मोनाली सागर पारधी ….

