कोरोना बाधितांवर आता कँमे-याची नजर!

262

गोपाल कडुकर, मुख्य संपादक – विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – नागपूर शहरात मोठ्या प्र्रमाणात वाढत असलेल्या कोरोना बाधितांमुळे शासनाने पुन्हा कडक निर्बंध सुरूच ठेवले आहे़ २१ मार्चपर्यंतचे असलेले लाँकडाउन आता पुढे ३१ मार्चपर्यंत कायम ठेवलेले आहे़ तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकानांना देण्यात येत असलेली दुपारी १ वाजतापर्यंतची मर्यादा ही ४ वाजेपर्यंत करण्यात आलेली आहे़ अशातच विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाबाधित रूग्ण सर्रासपणे फिरत असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित केला़ त्यांच्या या मागणीला सकारात्मता दर्शवित पालकमंत्र्यांनी ही मागणी मान्य केली़ शहरात चौकाचौकांमध्ये व मुख्य रस्त्यावर कँमेरे लावण्यात आलेले आहे़ आता याचाच वापर करण्यात येणार असून कोरोना रूग्ण बाहेर फिरतांना आढळल्यास त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल शिवाय गुन्हाही दाखल होऊ शकतो़ मागील काही दिवसांमध्ये कोरोना बाधितांच्या मुक्तपणे वावरण्याला आळा घालण्यासाठी ५ हजार रूपये दंड वसुली करण्यात आली होती़ मात्र आता कडक कारवाईसोबतच गुन्हेही दाखल होणार आहे़ सध्या प्रायोगिक तत्वावर काही भागातील कँमेºयांची मदत घेणार असून यामुळे भविष्यात आरोग्य यंत्रणेला नक्कीच फायदा होईल़