नागपूरात ३१ मार्चपर्यंत वाढला लाँकडाउन – पालकमंत्र्यांची घोषणा

664

अजय बिवडे, संपादक – विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा लाँकडाउन होणार का याची धास्ती व्यापारी वर्गासह सर्वसामान्यांना होती़ अशातच १५ ते २१ मार्च पर्यंत लाँकडाउन लावण्यात आला़ आता लाँकडाउन सोबतच कडक निर्बंध लावण्यात येतील अशा सुचना पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज केल्या़ सर्वपक्षीय बैठक आज नागपूर येथे घेण्यात आली़ यावेळी पालकमंत्री, नागपूर शहराचे पोलीस आयुक्त, नागपूर महानगरपालिका आयुक्त, नागपूर जिल्हाधिकारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार कृष्णा खोपडे, मोहन मते, विकास कुंभारे, प्रविण दटके यांच्यासह व्हिडीओ काँन्फरन्सींगच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,गृहमंत्री अनिल देशमुख हे उपस्थित होते़ कोरोनावर लाँकडाउन हा पर्याय नसुन यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी मान्य केले़ मात्र नागपूर शहरात वाढत असलेल्या कोरोना रूग्णांच्या संख्येने काही प्रमाणात निर्बंध घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले़
नागपूर शहरात लसीकरणाला वेग देण्यासाठी लसीकरण केंद्रांची वाढ करण्यात येणार असून विनाकारण गर्दी करणाºयांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे़ आता अत्यावश्यक सेवेतील दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवणार असून ३१ मार्चपर्यंत लाँकडाउन वाढविण्यात आलेला आहे़ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, कोरोना काळात अनेक खासगी रूग्णालयाने कोरोना वार्ड सुरू केलेले होते़ कालांतराने ते काही प्रमाणात बंद झाले़ मात्र रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आता ते परत सुरू करण्याची मागणी केलेली आहे़ तसेच वाढते मृत्यु हे रूग्णांना वेळीच न मिळत असलेल्या उपाचाराअभावी होत आहे़ त्यामुळे सुक्ष्म लक्षणे असणाºयांना घरीच विलगीकरणात ठेऊन त्यांच्याएवजी ज्यांना तातडीची गरज आहे अशांकडे आरोग्य विभागाने लक्ष केंद्रीत करावे अशीही मागणी त्यांनी यावेळी केली़