नातीनला आजीनेच सोपविले नराधमाला

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7628*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

263

नातीनला आजीनेच सोपविले नराधमाला
-नागपुरातील किळसवाणा प्रकार
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रनिधिी-नागपूर : आजीच्या मित्राने घरी पाहुणी म्हणून आलेल्या नातीनवर आजीच्या संमतीने अत्याचार केल्याची घटना गिट्टीखदान हद्दीत समोर आली. याप्रकरणी तक्रारीवरून आजी आणि तिच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, गिट्टीखदान हद्दीत मोलकरीणचे काम करणारी एक महिला राहते. ती परिसरात धुणी-भांड्याचे काम करते. त्याच परिसरात राहणा-या शेख इस्त्राईल शेख (४४) रा. गौसिया कॉलनी याच्या घरीही ती महिला मोलकरीण म्हणून काम करते. तिचे आणि शेख इस्त्राईलचे अनैतिक संबंध आहेत. तो नेहमी तिच्या घरी येत असतो. काही दिवसांआधी त्या महिलेची १९ वर्षीय नातीन मध्यप्रदेशातील शिवनी येथून तिच्या घरी पाहुणी म्हणून आली होती. आरोपी शेख इस्त्राईल नेहमीप्रमाणे महिलेच्या घरी आला. तेथे त्याला महिलेची नातीन दिसली. त्यावेळी ती महिला घरी नव्हती. काही वेळाने ती घरी आली. त्यानंतर शेख इस्त्राईलने तिच्या नातीनसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा सांगितली. त्यानंतर त्याने महिलेच्या संमतीने तिच्या नातीनवर बळजबरी अत्याचार केला. या प्रकारामुळे मुलगी पुरती घाबरली. दुस-या दिवशी ती तिच्या घरी शिवनीला निघून गेली. घरी पोहोचताच तिने हा प्रकार तिच्या कुटुंबीयांना सांगितला. त्यांनी मुलीला लगेच शिवनी पोलिस ठाण्यात नेऊन तक्रार नोंदविली. हे प्रकरण गिट्टीखदान हद्दीतील असल्याने गिट्टीखदान पोलिसांना हस्तांतरित करण्यात आले आहे.