कल्पना नरांजे लिखित गोरक्षण कादंबरीचे प्रकाशन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7618*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

211

कल्पना नरांजे लिखित गोरक्षण कादंबरीचे प्रकाशन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-नागपूर : कल्पना मनोहर नरांजे लिखित गोरक्षण कादंबरीचे आॅनलाईन प्रकाशन नुकतेचे प्रसिद्ध कवी प्रमोद अणेराव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. विदर्भ साहित्य संघ, सिंदी(रेल्वे) व वेध प्रतिष्ठान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात गोरक्षण कादंबरीवर भाष्य कवी, समीक्षक डॉ. गिरीष सपाटे, पालक मैत्री अभियान संयोजिका डॉ. संध्या पवार, कवी शफी पठाण यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात प्रमोद अणेराव म्हणाले, साहित्य क्षेत्रात महिलांच्या वावर कमी आहे व ज्या महिला लेखिका आहेत त्या कुटुंबवत्सल विषयावर लेखन करतात. मात्र, चौकटी बाहेर जाऊन अतिशय संवेदनशील असणारा गोरक्षणसारखा विषय सामाजिक व राजकीय अंगाने मांडलेला आहे. लेखिकेने सामाजिक विषयाचे अध्ययन करताना गुंतागुंतीचा असणारा गोरक्षण विषय अतिशय कुशलतेने हाताळला आहे. एकांगी लेखन न करता समन्वय साधून कुशलतेने मांडणी करून वाचकांच्या गळी उतरविला असल्याचे प्रतिपादन डॉ. गिरीष सपाटे यांनी केले. यावेळी डॉ. संध्या पवार म्हणाल्या, समाजात घडणा-या घटनामागील कारणांचा शोध लेखिकेने उत्तम प्रकार घेतला आहे. संयमी लेखणी या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. जीवनविषयक तत्वज्ञानाचा उलगडा गोरक्षणमधून झालेला आहे. समाजातील वास्तववादी विषय वस्तुनिष्ठ पद्धतीने कल्पना नरांजे यांनी मांडला आहे. प्रखर विषयाचे लेखन संयमित करून चौफेर बाजूचा विचार कादंबरीमध्ये वेळोवेळी दिसून येते. ग्रामीण भागाचा वैदर्भीय प्रतिबिंब क्षणोक्षणी दिसून येते, असे मत युवा समीक्षक शफी पठाण यांनी मांडले. प्रास्ताविक प्रशांत झिलपे, अतिथी परिचय डॉ. मनोहर नरांजे, संचालन राजेंद्र टेकाडे यांनी केले, तर आभार खुशाल कापसे यांनी मानले.