Home यवतमाळ वैशाली गावंडे जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित

वैशाली गावंडे जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित

0
वैशाली गावंडे जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित

वैशाली गावंडे जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-दिग्रस : तालुक्यातील आमला या दुर्गम गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षिका वैशाली गावंडे यांना नुकतेच जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण समारंभात त्यांचा गौरव करण्यात आला.
दरवर्षी जिल्हा परिषद उत्कृष्ट शैक्षणिक कार्य असणा-या प्राथमिक व काही माध्यमिक शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करीत असते. यावर्षी दिग्रस तालुक्यातून वैशाली भिमराव गावंडे यांची निवड करण्यात आली. वैशाली गावंडे या पदविधर शिक्षिका असून त्यांच्याकडे शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा प्रभारही आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदाताई पवार यांच्या हस्ते व शिक्षण सभापती श्रीधर मोहोड, जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम, राम देवसरकर, कांताताई कांबळे, पावणी कल्यामवार, स्वातीताई येंडे, दिग्रस पं. स. सभापती अनिताताई राठोड, शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गावंडे यांच्या शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक व राष्ट्रीय कायार्मुळे त्यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांची २८ वर्षे सेवा झाली असून त्यांनी दारव्हा येथे असतांना पहिली ज्ञानरचनावादी शाळा निर्माण केली होती. तसेच सुचिताताई पाटेकर गावकरी वाचनालयाची स्थापनाही केली होती. आमला येथे त्यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केन्द्राची स्थापना केली आहे. इन्व्हॉल्व्ह क्लब कडून शाळेला वाटरफिल्टर, विद्यार्थांना बुटमोजे, गाईड मुलींसाठी युनिफाँर्म मिळवून दिले आहेत. तंबाखू मुक्तीच्या कार्यासाठी त्यांना यवतमाळ रत्न पुरस्कार मिळाला आहे. त्या शाळेत अनेक उपक्रम राबवितात, तसेच सामाजिक कार्यातही त्यांचा सतत सहभाग असतो. त्यांनी एकून ११ पुस्तकांचे लेखनही केले आहे. आपल्या यशाचे श्रेय त्या सर्व पदाधिकारी, अधिकारी, शिक्षक बंधुभगिनी, स्नेही जन व विद्यार्थ्यांना देतात