संजय समर्थ यांचे देहावसान

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7596*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

217

संजय समर्थ यांचे देहावसान

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,भिवापूर : येथील प्रसिद्ध भिवापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अन्नाजी समर्थ यांचे द्वितीय चिरंजीव संजय समर्थ (वय ६१) यांचे गुरुवारी (१८ मार्च) नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मुळचे भिवापूर येथील रहिवासी असलेले संजय सर्मथ हे नागपूर येथे स्थायीक झाले. श्रीराम व्यायाम शाळा, रामदास पेठ, नागपूरचे ते संस्थापक अध्यक्ष होते. तसेच प्रसिद्ध मराठा लॉन्सर कल्बचे ते सदस्य होते. त्यांच्या पश्?चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, बहिण व बराच मोठा आप्तपरिवार आहे. शुक्रवारी दुपारी नागपूर येथील अंबाझरी दहन घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.