कवी व लेखक सुरेश राठोड यांची निवड

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7556*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

143

कवी व लेखक सुरेश राठोड यांची निवड

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,भिवापूर : स्थानिक राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भिवापूर येथील उत्कृष्ट कलाशिक्षक तसेच नाट्य व नृत्य दिग्दर्शक सुरेश राठोड यांची महाराष्ट्रातील गोर बंजारा समाजातील लेखक व कवी म्हणून निवड झाली आहे.
राठोड हे गावात व गावाबाहेर कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमात हिरारीने भाग घेत असतात. ते हुबेहूब चित्र काढण्यात पारंगत आहेत. त्यांनी बरेच लेख व कविता लिहिल्या आहेत. गोर बंजारा लेखक व कवी म्हणून निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय विद्यालयाच्या संचालिका लतीफा शेख, विद्यालयाचे मुख्याध्यापक इम्रान शेख, गजानन मुरकुटे, किशोर राऊत, फारुख शेख, अंगद शिवरकर, संजय बनकर, अजय चांदोरे, अझहर कुरेशी, टिकले, शारीरिक शिक्षक वाघमारे, लता शेंडे, फुला भागवत, वंदना हुकरे, कीर्ती मेहरकुरे, प्रणिता घुमे, भारती बालपांडे, शोएब कुरेशी, रेहान बाबू, शेषराव चौधरी, नाना दिघोरे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.