Home Breaking News जि.प. व पं.स.तील रिक्तपदांची पोटनिवडणूक

जि.प. व पं.स.तील रिक्तपदांची पोटनिवडणूक

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7551*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

74 views
0

जि.प. व पं.स.तील रिक्तपदांची पोटनिवडणूक

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,मुंबई(वृत्तसंस्था) : धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर जिल्हा परिषदतील ८५ निवडणूक विभाग आणि त्यांतर्गतच्या विविध पंचायत समित्यांमधील १४४ निर्वाचक गणांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ एप्रिल २0२१ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर १२ एप्रिल २0२१ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी गुरुवारी येथे दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने संबंधित ठिकाणच्या नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या सर्व जागा ४ मार्च २0२१ पासून रिक्त झाल्याचे आदेश निर्गमित केले आहेत. या रिक्त पदांच्या पोटनिडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रमही देणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार १५ जानेवारी २0२१ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय विभाजित केल्यानंतर ५ एप्रिल २0२१ रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर १२ एप्रिल २0२१ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर छापील मतदार याद्या २0 एप्रिल २0२१ रोजी अधिप्रमाणित करण्यात येतील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या २७ एप्रिल २0२१ रोजी प्रसिद्ध केल्या जातील.
निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणा?्या चुका, मतदाराचा चुकून विभाग किंवा निर्वाचक गण बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गणाच्या यादीत नाव नसणे आदींसंदभार्तील दुरुस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती मदान यांनी दिली.