Home Breaking News सोनेचांदीच्या दुकानातून ३ लाख ५२ हजार रुपयांचा माल केला लंपास

सोनेचांदीच्या दुकानातून ३ लाख ५२ हजार रुपयांचा माल केला लंपास

0
सोनेचांदीच्या दुकानातून ३ लाख ५२ हजार रुपयांचा माल केला लंपास

सोनेचांदीच्या दुकानातून ३ लाख ५२ हजार रुपयांचा माल केला लंपास

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, वर्धा : येथील श्रीराम टॉकीज जवळील नगरपालिका कॉम्प्लेक्स मधील श्री साई ज्वेलर्स या प्रतिष्ठानमध्ये बुधवारी मध्यरात्री धाडसी चोरी झाली. यात सुमारे ३ लाख ५२ हजार रुपयांचे सोन्या चांदीचा दाग दागिने चोरट्यांनी लंपास केला.
चोरट्यांनी दुकानाचे टीनेचे शेड तोडून आत प्रवेश केला आणि दुकानातील २ लाख रुपये किमतीचे ५0 ग्राम सोन्याचे दागिने, ६ ग्राम सोन्याची मोड किंमत ३0 हजार रुपये आणि दीड किलो चांदी किंमत ८२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या दुकानाचे संचालक सोमनाथ लोंढेकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची तक्रार नोंदविली आहे. विशेष म्हणजे या चोरट्यांनी आजू बाजूचे तीन दुकाने फोडण्याचाही प्रयत्न केला पण हा प्रयत्न फसला. चोरट्यांच्या हातात ज्वेलरीचे दुकान लागल्याने त्यांनी या दुकानात लुट करून पळ काढला. हे कॉम्प्लेक्स भरवस्तीत असून दिवसरात्र या परिसरात वर्दळ सुरू असते. मागील काही महिन्यात शहरात चोरीची मालिका सुरू असून पोलिस चोरट्यांपर्यंत अद्याप पोहचू शकलेले नाही. त्यामुळे व्यापारी त्यामुळे शहरवासीयांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संपत चव्हाण करीत आहे.